शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कितीही ताकद लावा, विजय विचारांचाच होईल : डॉ.सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 12:54 IST

मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे नेते माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसले होते.

संगमनेर : मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे नेते माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसले होते. पण महायुतीचा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा होता. प्रामाणिक भावनेने कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळेच आपला विजय निश्चित आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघ काबिज करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून खासदार लोखंडेंच्या पाठिशी उभे रहावे. कोणी कितीही ताकदलावू द्या, विजय हा विचारांचाच होईल, असा विश्वास विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केला.शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरुवारी शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉ.सुजय विखे बोलत होते. ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे, तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे रावसाहेब डुबे, डॉ.सोमनाथ कानवडे, कैलास तांबे, गुलाबराव सांगळे, किशोर नावंदर, शहराध्यक्ष अमर कतारी, राजेंद्र सांगळे, जयवंत पवार, अप्पा केसेकर, ज्ञानेश्वर कर्पे, सुधाकर गुंजाळ, दादासाहेब गुंजाळ, अ‍ॅड. रामदास शेजूळ, राजेंद्र देशमुख, जालिंदर वाकचौरे, नगरसेविका मेधा भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.विखे म्हणाले, या तालुक्याच्या नेत्यांनी मला नगरमध्ये येऊन विनाकारण विरोध केला. त्याची परतफेड करण्यासाठी मी आता तालुक्यात आलो आहे. मी माझ्या निवडणुकीत सर्वांना आव्हान दिले होते. ज्यांना ज्यांना मला विरोध करायचा आहे त्यांनी आवर्जून यावे. कारण मला विश्वास होता की महायुतीचा प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्ता माझ्या पाठिशी होता. विकासाच्या मुद्यांवर मीबोलत होतो. सामान्य माणसाला मी विश्वास दिला. म्हणूनच या निवडणुकीचे परिवर्तन विजयात होणार आहे.शिर्डी मतदारसंघातही हा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. कोणी कितीही ताकद लावू द्या, गाव पातळीवर तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. अंतर्मनातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे उद्दिष्ट डोळ््यासमोर ठेवा. आपला विजय निश्चित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019