शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिकेत साडेआठ कोटींची कामे बड्या ठेकेदारांना देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:06 IST

अहमदनगर: महापालिकेने साडेआठ कोटींच्या कामांसाठी मागविलेल्या निविदांवरून ठेकेदार व प्रशासनातील वाद चव्हाट्यावर आला आहे. निविदेत वाढीव क्षमतेच्या डांबर ड्रम मिक्स प्लँटची अट टाकण्यात आली आहे. हा प्लँट बोटावर मोजण्या इतक्याच ठेकेदारांकडे आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या कामांसाठी अशी अट नव्हती. ती याचवेळी का आणि कुणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आली? याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात आहे. 

अहमदनगर: महापालिकेने साडेआठ कोटींच्या कामांसाठी मागविलेल्या निविदांवरून ठेकेदार व प्रशासनातील वाद चव्हाट्यावर आला आहे. निविदेत वाढीव क्षमतेच्या डांबर ड्रम मिक्स प्लँटची अट टाकण्यात आली आहे. हा प्लँट बोटावर मोजण्या इतक्याच ठेकेदारांकडे आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या कामांसाठी अशी अट नव्हती. ती याचवेळी का आणि कुणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आली? याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात आहे. शासनाच्या नगरोत्थान महाभियान व नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत महापालिकेला ८ कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर आहे. या निधीतून २९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही कामे करण्यासाठी महापालिकेने आॅनलाईन निविदा प्रसिध्द केल्या आहेत. निविदा प्रसिध्द करताना त्यासोबत महापालिकेने एक शुध्दीपत्रक प्रसिध्द केले. त्यामध्ये डांबरीकरणाच्या कामासाठी डांबरचा प्लँट ६० ड्रम मिक्स क्षमतेचा असावा,अशी अट आहे. यापूर्वीच्या कामांसाठी ४५ ड्रम मिक्स क्षमतेच्या प्लँटची अट होती. हा प्लँट असलेल्या ठेकेदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे छोटे ठेकेदार त्यांच्याशी करार करून निविदा भरत होते. हा प्लँट असलेल्या ठेकेदारांशीच करार करून त्याची प्रत निविदेसोबत भरावी लागणार आहे. मात्र हे ठेकेदार किती जणांशी करार करणार, यावरच निविदेतील स्पर्धेचे गणित अवलंबून असणार आहे. ---अट वगळण्याची ठेकेदारांची मागणीडांबरीकरणाच्या कामासाठीची वाढीव क्षमतेच्या डांबर मिक्स प्लँटची अट वगळण्याची मागणी अभिजित काळे, ए.पी. सोनीमंडलेचा, दीपमाकर,चंद्रशेखर गटणे, निकेतन शिवाजी लोटके या चार ठेकेदारांनी निवेदनाव्दारे केली आहे.--- महापौरांचे प्रशासनाकडे बोट निविदेतील अटीबाबत महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, निविदेत काय अटी असाव्यात हा निर्णय पूर्णत: प्रशासनाचा आहे. प्रशासनाच्या कामात हस्तक्षेप करणे योग्य नाही. याबाबत प्रशासन निर्णय घेईल.