शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

मनसे सोबत आल्यास स्वागतच, पण एकच अट; प्रवीण दरेकरांची खुली ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 20:03 IST

हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत कुणीही आले तरी त्यांना सोबत घेऊ. मनसे सोबत आल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी एकप्रकारे खुली आॅफरच भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत कुणीही आले तरी त्यांना सोबत घेऊ. मनसे सोबत आल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी एकप्रकारे खुली आॅफरच भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर रविवारी नगर दौºयावर आले होते. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन एक लाख रुपयांची मदत दिली. ही भेट घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शाम पिंपळे आदी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतील निवडणुकीबाबत पत्रकारांनी छेडले असता दरेकर म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायद्याचे समर्थनच केलेले आहे. त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडला असून, हिंदुत्वाच्या मुद्यावर जे कोणी भाजपसोबत येतील त्यांचे स्वागतच आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले मुंबईतील सुशिक्षित मतदारांना आवडलेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत सुशिक्षित मतदार भाजपाच्या बाजूने राहिल, असे सूतोवाचही दरेकर यांनी केले. शिवसेनेच्या सहयोगी अल्पसंख्याक मंत्रीनवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मान डोलावून मुस्लिम आरक्षणाचे समर्थन केले. महाविकास आघाडीतील आबू आझमी यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत राम मंदिराबरोबरच मशिदीतही जाणार असल्याचे सांगितले. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मशिदीसाठीचे ट्रस्ट स्थापन करण्याचे सूतोवाच केले आहे. महाविकास आघाडीत राम मंदिराबाबत मोठा विसंवाद निर्माण झाला असून, सेनेचा गोंधळ उडालेला दिसतो, अशी टीका दरेकर यांनी केली......तर बळीराजाचे प्राण वाचले असतेकर्जाला कंटाळून मल्हारी बटुळे या शेतकºयाने आत्महत्या केली. बटुळे यांच्याकडे अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे ११ लाखांचे कर्ज होते. परंतु,सरकारने केवळ दोन लाखांपर्यंतचेच कर्ज माफ केले. सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असता तर बटुळे यांनी आत्महत्या केली नसती. बटुळे यांची आत्महत्या हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.