शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा में बेहत्तर इंन्सानियत हमने देखी..!; उत्तरप्रदेशातील युवकाच्या भावना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:41 IST

लॉकडाऊनमध्ये आम्ही पायी उत्तरप्रदेशकडे जात असताना निमगाव खलू चेक पोस्टवर पकडलो गेलो. त्यावेळी खूप घाबरलो. पण श्रीगोंदा येथील निवारा केंद्रात आम्हाला घरच्यासारखे प्रेम दिले. भोजन दिले. मैने इंन्सानियत किताब पढी थी.. लेकीन उससे बेहत्तर इंन्सानियत हमन श्रीगोंदा हमने देखी.. अशी भावना उत्तरप्रदेशातील युवक मोहम्मद आसिफ यांंनी व्यक्त केली.

बाळासाहेब काकडे/लोकमत न्यूज नेटवर्क  श्रीगोंदा : लॉकडाऊनमध्ये आम्ही पायी उत्तरप्रदेशकडे जात असताना निमगाव खलू चेक पोस्टवर पकडलो गेलो. त्यावेळी खूप घाबरलो. पण श्रीगोंदा येथील निवारा केंद्रात आम्हाला घरच्यासारखे प्रेम दिले. भोजन दिले. मैने इंन्सानियत किताब पढी थी.. लेकीन उससे बेहत्तर इंन्सानियत हमन श्रीगोंदा हमने देखी.. अशी भावना उत्तरप्रदेशातील युवक मोहम्मद आसिफ यांंनी व्यक्त केली. यावेळी आसिफ याला डोळ्यातील आनंदाश्रू लपविता आले नाहीत.    मोहम्मद असीफ हा मूळ उत्तरप्रदेशमधील आहे. तो पुणे येथे आयटीचे प्रशिक्षण घेत आहे. पुण्यावरून तो व त्याचे सहकारी मित्र दौंडला पायी आले.परंतु त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू चेक पोस्टवर  पोलिसांनी पकडले.  पोलिसांनी त्यांना श्रीगोंदा येथील महानिवारा केंद्रात आणले होते. मोहम्मद असिफ  पुढे म्हणाला, पोलिसांनी पकडले. त्यावेळी आम्ही खूप घाबरलेले होतो. प्रशासनाने महादजी शिंदे विद्यालयात आमची घराच्यासारखी व्यवस्था केली. चहा, नाष्टा, जेवण वेळेवर आणि पिण्यास  फिल्टर पाणी होते. तहसीलदार महेंद्र महाजन साहेब  व इतरांनी आमची आस्थेने विचारपूस करीत होते. जेवण बनविणारे खूपच चांगली माणसे होती. या ठिकाणी पापा, माँ सारखे प्रेम मिळाले. भविष्यात कुणावर संकट आले तर मी पुढच्या रांगेत उभा राहील व माझे कर्तव्य बजावेल. ही शिकवण येथे मिळाली आहे. देवाच्या रुपाने काम करणारे प्रशासकीय अधिकारी, येथील नागरिकांना माझा आदरपूर्वक सलाम आहे. ६४४ मजूर लखनऊला रवाना  लॉकडॉऊनमुळे श्रीगोंदा तालुक्यात अडकलेले सुमारे साडेसहा हजार नागरिक अडकले होते. त्यामध्ये उत्तरप्रदेश राज्यातील ६४४ मजूर होते.   रविवारी (दि.१० मे) तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या उपस्थितीत १३ बस करून त्यांना नगरला रेल्वे स्टेशनवर पाठविण्यात आले. हे विशेष रेल्वेने लखनऊला रवाना झाले. या सर्व मजुरांना  फूड पॅकेट, पाणी, बिस्कीट, भेळ देण्यात आली. यावेळी तहसीलदार महेंद्र महाजन, निवासी तहसीलदार डॉ. योगिता ढोले, श्रीगोंदा आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे, पुरवठा विभागाचे दत्तात्रय सांळुके, मंडलाधिकारी प्रशांत कांबळे, तलाठी कृष्णा गुजर, गणेश मुसळे, रवी लष्करे यांनी त्यांना निरोप दिला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार