शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोनात पॉझिटिव्ह झालो... जगण्यासाठीही पॉझिटिव्ह राहिलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:47 IST

अहमदनगर : कुठलीही लक्षणे नव्हती़ पण, परिसरात रुग्ण सापडल्याने कुटुंबासह तपासणीसाठी गेलो. आई- वडिलांचे अहवाल निगेटिव्ह आले़ माझा एकट्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर एकदम घाबरून गेलो़ परंतु बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आणि भीती गायब झाली. पॉझिटिव्ह आलो तरी पॉझिटिव्ह विचारांना सोडले नाही. जगण्याची आशा भक्कम ठेवत नियम पाळले. म्हणून आज तुमच्यासमोर जीवंत उभा आहे, असे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाने ‘लोकमत’ला सांगितले़

अण्णा नवथर । अहमदनगर : कुठलीही लक्षणे नव्हती़ पण, परिसरात रुग्ण सापडल्याने कुटुंबासह तपासणीसाठी गेलो. आई- वडिलांचे अहवाल निगेटिव्ह आले़ माझा एकट्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर एकदम घाबरून गेलो़ परंतु बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आणि भीती गायब झाली. पॉझिटिव्ह आलो तरी पॉझिटिव्ह विचारांना सोडले नाही. जगण्याची आशा भक्कम ठेवत नियम पाळले. म्हणून आज तुमच्यासमोर जीवंत उभा आहे, असे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाने ‘लोकमत’ला सांगितले़नाव न सांगण्याच्या अटीवर आधी कोरोनाबाधित असलेल्या व नंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाशी ‘लोकमत’ने दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला, कोरोना हा आजार काय आहे, हे टीव्हीवरून पाहिले होते़ तो आजार विदेशात होता़ आपल्याकडे येईल, असे कधीही वाटले नाही़ पण, अचानक गल्लीतील एकाला त्रास सुरू झाला़ एकानंतर दुसरा, तिसरा असे रुग्ण वाढत गेले़ आरोग्य सेविकांनी घरी येऊन तपासणी केली़ सर्दीची अ‍ॅलर्जी पाचवीला पूजलेली आहे. या सर्दीमुळेचमीही आई-वडिलांसह तपासणीसाठी गेलो. वैद्यकीय अधिकाºयांनी स्त्रावाचे नमुने घेतले़ मनात भीती होती़ तिघांचे अहवाल आले़ दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले़ एक पॉझिटिव्ह होता़ तो माझाच असल्याने सुरवातीला धक्का बसला. त्यामुळे डॉक्टरांनी बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ कमालीची भीती वाटत होती़ काय होणार? आपण बरे होऊ का? दवाखान्यात उपचार मिळतील का? यासह अनेक प्रश्न मनात गुंता करीत होते़ परंतु, दवाखान्यात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले़ तब्बल २० दिवस दवाखान्यात उपचार घेतले़ कोणतीच लक्षणे नाहीत, असे डॉक्टर सांगत होते़ पण,तरीही भीती होतीच़ दवाखान्यात योग्य पध्दतीने उपचार झाले़ डॉक्टर जे सांगत होते, ते सर्व नियम पाळले. मनात जगण्याची पक्की आशा ठेवून एक- एक दिवस स्वत:मध्ये डोकावत होतो. विसाव्या दिवशी रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले़ घरी आल्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन आहे़ बाहेर फिरत नाही़ आता घरात बसण्याची सवय झाली आहे़ कुटुंबातील व्यक्तींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो़ कुठलाही त्रास नाही़ पौष्टिक भोजन, व्यायाम करतो. कोरोना कसा झाला़ हे समजले नाही़ पण, त्यातून बरा झालो़  आता नेहमीप्रमाणे काम सुरू केले आहे, असे हा रुग्ण सांगत होता़----------नगरच्या आरोग्य यंत्रणेसाठी शब्द नाहीत़़़़ कोरोना आजार महाभयंकर असला तरी आपली आरोग्य यंत्रणा त्याच्याशी लढण्यासाठी सक्षम आहे़ फक्त ते जे सांगतील ते एका़ कोरोना आजारावर नगरमध्ये चांगले उपचार दिले जात आहेत. त्यामुळेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे़ नगरच्या आरोग्य यंत्रणेसाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे रुग्णाने सांगितले़