शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला नाही कोरोनाची भीती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील मार्चअखेरच्या दि.२८ आठवडे बाजारात विक्रेते व ग्राहकांची उदंड गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी ...

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील मार्चअखेरच्या दि.२८ आठवडे बाजारात विक्रेते व ग्राहकांची उदंड गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी ‘आम्हाला नाही कोरोनाची भीती’, अशा आवेशात लोक वावरत असल्याचे चित्र होते. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

कोरोना शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पाय पसरत असताना लोक मात्र निर्धास्त आहेत. काळजी घेतली तर सरकारला सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच आठवडी बाजार बंद करण्याची गरज पडणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २९ पासून दि. १५ एप्रिलपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा परिणाम विसापूर येथील आठवडी बाजारात दिसून आला. लोकांनी नेहमीपेक्षा या वेळी शेवटचा बाजार म्हणून बाजारहाट करण्यासाठी जास्त गर्दी केली होती. काही लोक मास्क लावून कोरोनापासून बचाव करण्यासाठी जागरूक असल्याचे दिसून आले. कोरोनाची आम्हाला कोणीही भीती नसल्याच्या आविर्भावात वावरत होते. विक्रेतेही सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करायला तयार नाहीत.

--

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता

पुढील काही दिवस आठवडी बाजार बंद राहणार असल्याने आपण मोठ्या कष्टाने पिकविलेला भाजीपाला कोठे विकायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. १५ एप्रिलपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी डेटलाइन दिली आहे. मात्र, त्यात पुढे वाढ झाली तर काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. या‌वेळीही उन्हाळ्यात शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सामना तर करावा लागणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे.

--

२८ विसापूर

विसापूर आठवडी बाजारात ग्रामस्थांची झालेली गर्दी.