शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वारूळवाडी, तांदळी, अकोळनेर, घोसपुरी, शिराढोण बिनविरोधच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST

नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १ हजार ८८५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत . सोमवारी ११ ते ३ ...

नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १ हजार ८८५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत . सोमवारी ११ ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तालुक्यातील आंबिलवाडी व वारूळवाडी या दोन गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्यात जमा आहेत. शिराढोण, तांदळी वडगाव, दशमी गव्हाणमधील निम्म्याहूक अधिक जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांवरील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अकोळनेर व घोसपुरी या दोन गावातही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला आहे.

आदर्शगाव हिवरेबाजार येथेही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या ३० वर्षांपासून या गावातील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. खडकीतही बिनविरोध निवडणूक करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी प्रयत्न केले आहेत. येथील निवडणूक बिनविरोधची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खंडाळा गावातही यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नगर तालुक्यातील बहुतांश गावात भाजप ( माजी आमदार शिवाजी कर्डिले गट ) आणि शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्यातच दुरंगी लढत होणार आहे. काही ठिकाणी गावातील जुन्या प्रस्थापितांविरोधात तरूणाई एकत्र आल्याने तेथे तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

...

नेते मंडळींकडून मनधरणी

सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच प्रत्येक गावातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. किती अर्ज मागे घेतले जातात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, अर्ज मागे घेण्यासाठी नेते मंडळींकडून मनधरणीही करण्यात येत आहे. उद्या लगेच चिन्ह वाटप केले जाणार आहे. मतदान केंद्रांची निश्चित संख्याही उद्याच निश्चित होणार आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले व महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे गावागावातील राजकीय घड़ामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

...

फोटो-०३वारूळवाडी सत्कार

..

ओळी - नगर तालुक्यातील वारूळवाडी येथील बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.