टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील धुमाळ वस्तीवरील पाणवठयात डॉ. संपत दत्तात्रय देशमुख (सध्या रा. नेरळ, माथेरान) यांनी टँकरद्वारे पाणी सोडले आहे. यामुळे वन्यजीवांची भटकंती थांबणार आहे.
भोंद्रे, टाकळी ढोकेश्वर, निवडुंगेवाडी परिसरात हरणांचे मोठमोठे कळप आहेत. याशिवाय लांडगे, कोल्हे, मोर, बिबट्या, तरस, ससे, घोरपड, खारुताई, सरडे, विविध प्रजातींचे साप, विविध पक्षी आहेत. सध्या उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने तलाव, विहिरी, बोरवेल कोरडे ठाक पडल्याने वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यातच या भागातील पाणवठेही कोरडे आहेत. याची दखल घेत संपत देशमुख यांनी स्वखर्चाने टँकरच्या साहाय्याने पाणवठा भरला आहे.
----
१४ टाकळी ढाेकेश्वर
टाकळी ढोकेश्वर येथील धुमाळ वस्तीवरील तलावातील पाणवठ्यात पाणी सोडताना शिक्षक किरण पायमोडे.