शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी साठविण्याची सोय नसल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी : टँकर ठेकेदारांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 12:52 IST

प्रत्येक गावात टँकर कोठे खाली करायचा ती सोय करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे ही सोयच उपलब्ध नाही.

अहमदनगर : प्रत्येक गावात टँकर कोठे खाली करायचा ती सोय करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे ही सोयच उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक वस्तीवर व गल्लीत टँकरची खेप पोहोचविण्याची वेळ येते. यातून पाणी पुरवठ्यास विलंब होतो अशी समस्या टँकर पुरवठादारांनी उपस्थित केली आहे.‘लोकमत’मधून पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर व्यवस्थेबाबत अनेक प्रश्नउपस्थित केले गेल्याने टँकर पुरवठादारांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपली बाजू मांडली. गाडे ट्रान्सपोर्टचे नाना गाडे, साई सहारा इन्फ्रा पारनेरचे सुरेश पठारे, गणेश सहकारी मोटार वाहतूक संस्थेचे हरिभाऊ डुकले, जामखेड वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्थेचे ज्ञानेश्वर झेंडे, वैभव लॉजिस्टिकचे अण्णासाहेब थोरात व लक्ष्मी माता मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्टचे सुरेश चिडे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.टँकरचालक खेपा वेळेवर पोहोचविण्याचाच शक्यतो प्रयत्न करतात. मात्र, या पुरवठ्यात अनेकदा अडचणी येतात. गावात टँकर एकाच ठिकाणी खाली झाला तर वेळ वाचेल. मात्र, नागरिक वाडी, वस्तीवर छोटे भांडे ठेवतात. त्यामध्ये पाणी सोडताना वेळ जातो. पाण्याचाही अपव्यय होतो. बºयाचदा पाणी जेथून भरायचे त्या उदभवाच्या ठिकाणी वीज खंडित झालेली असते. पंचायत समितीचा उद्भव प्रतिनिधीही वेळेवर उपस्थित नसतो. त्यामुळे गावांमध्ये खेपा पोहोचविण्यास उशीर होतो. मात्र, खेपाच होत नाही, असे कधीही घडत नाही, असे या पुरवठादारांचे म्हणणे आहे.गावांची पाण्याची खेप एकाच ठिकाणी खाली करण्याची सुविधा उपलब्ध केली तर खेपा सुरळीत होतील, असेही या पुरवठादार संस्थांचे म्हणणे आहे. हंड्यासारखी छोटी भांडी थेट टँकरला लावली जातात ही पद्धत चुकीची आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने नामनिर्देशित केलेल्या महिलांची स्वाक्षरी टँकरच्या लॉगबुकवर घ्यावयाची आहे. मात्र, बºयाचदा या महिला उपस्थित नसतात. अशावेळी या महिलांची स्वाक्षरी राहून जाते. ग्रामसेवकही गावात उपस्थित नसतात. त्यामुळे ग्रामसेवकांची स्वाक्षरी एकाच वेळी घ्यावी लागते, असे कारणही पुरवठादारांनी सांगितले.टँकरला जीपीएस प्रणाली बसविण्याची जबाबदारी ही पुरवठादार संस्थांची आहे. या प्रणालीतून जीपीएस ट्रॅकिंग हे आॅनलाईन दिसायला हवे ही ‘लोकमत’ची मागणी रास्त असल्याचे पुरवठादार यांनीही मान्य केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्याकडे हे ट्रॅकिंग पाहण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी बहुधा नाहीत. त्यामुळे आम्ही या ट्रॅकिंगचे प्रात्यक्षिक ‘लोकमत’ला दाखवू असेही पुरवठादार संस्थांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय