शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीतील पाणी संपले

By admin | Updated: June 27, 2016 00:56 IST

शिर्डी : साई संस्थानच्या तलावापाठोपाठ नगरपंचायतच्या साठवण तलावानेही मान टाकली़ रविवारी या तलावातून अखेरचे पाणी उपसून नागरिकांना देण्यात आले़

शिर्डी : साई संस्थानच्या तलावापाठोपाठ नगरपंचायतच्या साठवण तलावानेही मान टाकली़ रविवारी या तलावातून अखेरचे पाणी उपसून नागरिकांना देण्यात आले़ त्यामुळे आगामी काही दिवस शिर्डीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शिर्डीत प्रथमच एवढी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़गेल्या पंधरवाड्यात संस्थानने पाण्याअभावी भक्तनिवास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला़ नगरपंचायत गेले काही दिवसांपासून दर दहा दिवसांनी पाणी पुरवठा करत होती, ते पाणीही आता संपले़ शिर्डीतील कूपनलिका दोन महिन्यांपूर्वीच कोरड्या पडल्या आहेत़ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील पाणीही संपुष्टात आले़ पैसे देऊनही पाणी मिळेनासे झाले आहे़ आपापल्या प्रभागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या नेतेमंडळींचीही पाण्याच्या उपलब्धतेसाठी दमछाक होत आहे़ डॉ़ सुजय विखे यांनी लोकसहभागातून राबवलेल्या जलक्रांती योजनेतून ओढे, नाल्यांचे खोलीकरण झाले़ मात्र आता या योजनेलाही पावसाची प्रतीक्षा आहे़या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने शहरात तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी केली आहे. गेल्या १४ जून रोजी नगरपंचायतने विशेष सभा घेऊन याबाबत ठराव केल्याचेही गोंदकर यांनी सांगितले़ नव्यानेच रूजू झालेले मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करावी व टँकरने थेट मुळा धरणातून पाणीपुरवठा करावा, अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा गोंदकर यांनी दिला आहे़(तालुका प्रतिनिधी)नगरपंचायतच्या साठवण तलावाची क्षमता मोठी असली तरी ६५ टक्क्याहून अधिक पाण्याची गळती होत असल्याने या तलावात तातडीने प्लॅस्टिक कागद टाकावा किंवा कायम स्वरूपी काँक्रिटीकरण करावे, शहरासाठी मंजूर झालेल्या २२ कोटींच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करावे, थेट निळवंडे धरणातून बंद पाईपने पाणी आणावे आदी मागण्याही गोंदकर यांनी केल्या आहेत़