शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मुळाच्या गेटपर्यंत पाणी

By admin | Updated: August 5, 2014 23:58 IST

राहुरी : आतापर्यंत मुळा धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला असून, नवीन आवक सुरूच आहे. धरण आता ५५ टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात १ टीएमसी नवीन पाणी आले

राहुरी : आतापर्यंत मुळा धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला असून, नवीन आवक सुरूच आहे. धरण आता ५५ टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात १ टीएमसी नवीन पाणी आले. धरणाच्या दरवाजांना पाणी खेटले असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत १४९१७ दशलक्ष घनफूट साठा झाला. मंगळवारी सकाळी ६ वाजता मुळा धरणात १४३३९ दलघफू पाण्याची नोंद होऊन १७८७़४० फूट पातळी गाठली़ सायंकाळी १५१०० क्युसेकने आवक सुरू होती़ पाणी पातळी १७९६ फूट व साठा १७७५७ दलघफू झाल्यानंतर पाणी सोडले जाते़ मात्र, यंदा ही पातळी न ओलांडल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेले नाही़(तालुका प्रतिनिधी)राजूर : भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरूच असून, सोमवारी रात्री या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला. पाणलोटात सोमवारी दिवसरात्र मुसळधार पाऊस कोसळला. भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी नऊ इंच तर घाटघरला आठ इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक झपाट्याने झाली. सायंकाळी संपलेल्या चोवीस तासात एकूण साठ्याच्या तब्बल पाच टक्के नवीन पाणी येत पाणीसाठा ८ हजार ८९१ दलघफू इतका झाला. दिवसभरातील बारा तासात या धरणात २६२ दलघफू नवीन पाणी आले. यातील वीज निर्मितीसाठी ३६ दलघफू पाण्याचा वापर होत २२६ दलघफूने पाण्याच्या साठ्यात वाढ झाली.भंडारदरा धरणातून वीज निर्मितीसाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्याबरोबरच कळसूबाईच्या पर्वतरांगातील पाणीही निळवंडे धरणात येत असल्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ३ हजार ७९७ दलघफू इतका झाला.हरिश्चंद्र गडाच्या पर्वतरांगातही दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे मुळा नदीच्या विसर्गात वाढ झाली. आज मुळेचा विसर्ग १५ हजार ६७६ क्युसेक इतका होता. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.आढळा खोऱ्यातही समाधानारक पाऊस बरसत असल्यामुळे देवठाणजवळील आढळा धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. सकाळी सहा वाजता या धरणातील पाणीसाठा ४२४ दलघफू झाला होता. (वार्ताहर)रतनवाडीला २२४ मिमी पाऊससकाळी संपलेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे- रतनवाडी- २२४ मिमी, घाटघर- २०२ मिमी, पांजरे- ११५ मिमी, भंडारदरा- १०१ मिमी, वाकी- ८० मिमी तर निळवंडे- ५७ मिमी आणि अकोले ५० मिमी.