शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदामंत्री महाजन अण्णांच्या भेटीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:57 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या महात्मा गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. गिरीष महाजन आज राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्याशी शिष्टाईसाठी येत आहेत.

ठळक मुद्दे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णांचे मन वळवण्याचा प्रयत्न

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या महात्मा गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. गिरीष महाजन आज राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्याशी शिष्टाईसाठी आले आहेत. मागील आंदोलनातही डॉ. महाजन हे राज्याचे दूत म्हणून हजारे यांच्याशी संपर्कात होते.  केंद्र सरकारच्या विरोधात शेतकºयांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती या प्रश्नी मार्च महिन्यात हजारे यांनी रामलीला मैदानावर उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री डॉ. गिरीष महाजन यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधून मागण्यांवर सर्वमान्य तोडगा काढून ११ मुद्यांवर लेखी आश्वासन दिले होते. अण्णा हजारे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी भ्रष्टाचारमुक्त भारत हेच त्यांचे लक्ष्य आहे. हजारे यांच्या मागण्या जनहिताच्या असून त्यांचे वय पाहता पुन्हा उपोषणाची वेळ त्यांच्यावर येऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. उपोषण सोडताना अण्णांनी ६ महिन्यांत आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांनंतर लेखी आश्वासनांतील कोणत्याच मुद्यांवर कार्यवाही झाली नसल्याने हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांना उपोषणाचा इशारा दिला होता. जनतेला फसविणारे कृतघ्न सरकार असल्याचा संतापजनक टोलाही अण्णांनी मोदींना लगावला होता व येत्या गांधी जयंतीपासून उपोषण करणार असल्याचे म्हटले होते.  याच पार्श्वभूमीवर डॉ. महाजन राज्य सरकारच्या वतीने अण्णांशी चर्चा करण्यासाठी महाजन आले आहेत. या भेटीत ते नेमकी काय शिष्टाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे