शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आढळातील पाणी पिण्यासाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 13:28 IST

अकोले तालुक्यातील आढळा धरणाचा पाणीसाठा कमी होत असल्याने शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मंगळवारी धरणात १९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.

अकोले : अकोले तालुक्यातील आढळा धरणाचा पाणीसाठा कमी होत असल्याने शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मंगळवारी धरणात १९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.लाभक्षेत्रातील वीरगाव, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव व गणोरे या पाच गावांसाठी पिण्याचा नळपाणी पुरवठा याच धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. या पाचगाव नळपाणी योजनेच्या उपसापंपापासून धरणातील पाणीसाठा दूर सरकत आहे. पाणी पातळी खोल तळाकडे गेल्यास नळपाणी योजनेसाठी पाणी टंचाईची झळ बसू शकते. आता धरणात १९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामधील ८५ दशलक्ष घनफूट पाणी मृत साठ्यातच आहे.गेल्या पावसाळ्यात धरणात पूर्ण क्षमतेने एक हजार ६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. दरम्यान, लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामात दोन व उन्हाळी हंगामात एक पाण्याचे आवर्तन जलसंपदा विभागाने दोन्ही कालव्यांना सोडले होते. लाभक्षेत्रातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी सिंचनाचा लाभ झाला. आता शिल्लक पाणीसाठा राखून ठेवण्यात आला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले