राहुरी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शनिवारी सकाळी सहा वाजता २३० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़ यातून मुसळवाडी तलावात पिण्यासाठी पाणी साठवून नंतर शेतीसाठी आवर्तन पूर्ववत होणार आहे़मुळा नदीपात्रातून व कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राहुरी पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव गाडे, महावितरणचे सदस्य अजित कदम, शब्बीर देशमुख, अमृत धुमाळ, दिलीप जठार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती़ शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी पाणी न सोडल्यास आंदोलन केला जाईल, असा इशारा दिला होता़ २६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १८६६१ दलघफू पाणीसाठा आहे़ पाणलोट क्षेत्रातून १५३२ क्युसेकने पाणी आवक सुरू आहे़ (तालुका प्रतिनिधी)
मुळा धरणातून पाणी सोडले
By admin | Updated: August 17, 2014 00:03 IST