शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शेतीसाठी धरणातून पाणी सोडले

By admin | Updated: August 24, 2014 01:55 IST

राहुरी/अकोले/राजूर : लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून खरीप पिकांच्या जीवदानासाठी अखेर मुळा व निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी आवर्तन सोडण्यात आले.

राहुरी/अकोले/राजूर : लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून खरीप पिकांच्या जीवदानासाठी अखेर मुळा व निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी आवर्तन सोडण्यात आले. २२ ते २५ दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून, यादरम्यान दोन्ही धरणांतून सुमारे ९ टीएमसी पाणीवापर होण्याची शक्यता पाटबंधारे खात्याकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, या निर्णयामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. मुळा पाटबंधारे खात्याच्या सूचनेवरून डाव्या क ालव्यातून शुक्रवारी सकाळी ६ वाजता १५०,सकाळी ९ वाजता २००, दुपारी १२ वाजता २५०, तर दुपारी ३ वाजता ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़ डाव्या कालव्याखाली ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळणार आहे़ त्याचबरोबर धरणाच्या उजव्या कालव्यातुनही शनिवारी सायंकाळी ७५० क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले़ त्यात नंतर वाढ करण्यात येणार असून या कालव्याखाली २६००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. साधारण ३८ दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे़ लाभक्षेत्रावर पावसाने हजेरी लावली तर आवर्तनाचा कालावधी कमी होऊ शकतो़२६००० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात सध्या १९ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. लाभक्षेत्रात पाऊस झाला नाही तर दोन्ही कालव्यांतून सुमारे ६ टीएमसी पाण्याचा वापर होऊ शकतो. (प्रतिनिधी)अकोले: निळवंडे धरणातूनही शनिवारी सायंकाळी सहा वाजता शेतीसाठीचे पहिले आवर्तन सोडण्यात आले.भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी दीड महिन्याच्या उशिराने पावसाचे आगमन होऊनही पंधरा आॅगस्टपूर्वी धरण भरले. याबरोबरच निळवंडे धरणही ९० टक्क्यांहून अधिक भरले मात्र लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले. लाभक्षेत्रातील पिकांसाठी भंडारदरा-निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची मागणी वाढत असतानाच पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दोन दिवसांपूर्वी पाणी सुटणार असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता वीजनिर्मितीसाठी ८१६ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. याबरोबरच निळवंडे धरणाच्या पाणलोटातही मुसळधार पावसाच्या सरी बरसल्यामुळे सकाळी निळवंडे धरणातील पाणी साठ्याने सहा टीएमसीचा टप्पा पार केला होता. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून १ हजार ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या आवर्तनात ३ टीएमसी पाणी वापरले जाण्याची शक्यता असून, हे आवर्तन सुमारे पंचवीस दिवस चालणार असल्याचा अंदाज जलसंपदाचे सहाय्यक अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. निळवंडे धरणातून पाणी सोडतेवेळी धरणात ६ हजार १०४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.(तालुका प्रतिनिधी)