शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीतील पाणीसाठा खालावला : आवर्तन पाच दिवसात होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:47 IST

कुकडी लाभक्षेत्रात ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, मात्र कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे.

श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रात ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, मात्र कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. मान्सूनने गुजरात, राजस्थानकडे आगेकूच केली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पाऊस केव्हा सुरू होणार ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे भात लागवडीसाठी पाणलोट क्षेत्रातील शेतकरी पावसाला साकडे घालू लागले आहेत.येडगाव धरणात १ हजार १५६ एमसीएफटी (४१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पिंपळगाव जोगे धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले असून येडगाव धरणातून सोडण्यात येत असलेले आवर्तन चार ते पाच दिवसात बंद करण्यात येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माणिकडोह धरणात ७३३ एमसीएफटी (५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणात ९७ मिलिमीटर (८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.डिंबे धरणात ५८९ एमसीएफटी (५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. पिंपळगाव जोगे धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पात २ हजार ५७५ एमसीएफटी (८ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी १ हजार ६०५ एमसी एफटी (५ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. घोड धरण रिकामे झाले असून विसापूर तलावात ४२ एमसीएफटी (५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. सीना धरणात १४९ एमसीएफटी (८ टक्के) तर खैरी तलावात ५७ एमसीएफटी (१२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा