अहमदनगर : येथील कल्याण रोड भागाला दिवसाआड पाणीपुरवठा मिळावा, यासह निधीचे समान वाटप करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिका कार्यालयात ठिय्या दिला. तसेच सभागृहातही सदस्यांनी पाणी प्रश्नावरून सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवरच धरले.
महापालिकेची मंगळवारी सर्वसाधारण सभा होती. दरम्यान कल्याण रोड परिसरातील पाणीप्रश्नासाठी या भागातील सेनेचे नगरसेवक सचिन शिंदे व श्याम नळकांडे यांनी प्रशासकीय इमारतीत फर्चिवर ठाण मांडले. यावेळी दिवसाआड पाणी मिळालेच पाहिजे, असे फलक घेऊन नगरसेवकांसह सेनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. पाणी नाही, तर पाणीपट्टी नाही, कल्याण रोड परिसरात महापालिकेतून वगळा, यासह अन्य घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी आंदोलन कार्यकत्यांशी चर्चा केली. त्यानंतर फल घेऊन नगरसेवक सभागृहात पोहोचले. त्यांनी तिथे महापौरांसह आयुक्तांना धारेवर धरले. सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची जोरदार मागणी केल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. कल्याण रोडवरील शिवाजीनगर, दातरंगे मळा, नालेगाव भागाला १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. मागील सभेतही शिंदे व नळकांडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सेनेच्या नगरसेवकांनी अक्रमक पवित्रा घेतला. सभेच्या दिवशी प्रशासकीय इमारतीत ठिय्या देत पाणी प्रश्नाकडे सत्ताधारी व प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत आयुक्तांशीही चर्चा केली. या भागातील पाणीप्रश्नी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी पाणीपुरवठा विभाग व नगरसेवकांची तातडीने बैठक बोलविली असून, या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक अनिल शिंदे, मदन आढाव, संग्राम शेळके, प्रशांत गायकवाड, संतोष गेनाप्पा, संजय शेंडगे, नीलेश भाकरे, पारुनाथ ढोकळे यांच्यासह कल्याण रोड परिसरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
.....
...तर अधिकाऱ्यांचे नळ कनेक्शन तोडणार
महापालिकेची ऑनलाइन महासभा सुरू होती. सभा सुरू झाल्यानंतर सभागृृहातही नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, अनिल शिंदे, प्रशांत गायकवाड, अनिल बोरुडे, योगीराज गाडे, संग्राम शेळके आदींनी आंदोलन केले. यावेळी कल्याण रोडवरील काही आंदोलक नागरिकही सभागृहात फलक हातात घेऊन घुसले होते.
..
सूचना फोटो आहे.