शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हिवरे बाजारच्या ग्रामसभेत मांडला पाण्याचा ताळेबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 13:13 IST

नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. यावर्षी हिवरे बाजारमध्ये एकूण ३७० मिलीमिटर पाउस पडला. दरवर्षीप्रमाणे पडलेल्या पावसाच्या आधारे पाण्याच्या वापरासाठी पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेत मांडण्यात आला.

केडगाव : नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. यावर्षी हिवरे बाजारमध्ये एकूण ३७० मिलीमिटर पाउस पडला. दरवर्षीप्रमाणे पडलेल्या पावसाच्या आधारे पाण्याच्या वापरासाठी पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेत मांडण्यात आला. ग्रामस्थांशी चर्चा करताना पोपटराव पवार म्हणाले, गेली अनेक वर्षे आपल्या सर्वांच्या सहकार्याने पडलेल्या पावसावर आधारित पीक पद्धतीमुळे गेल्या वर्षी कमी पाऊस असूनही गावात पाण्याची टंचाई जाणवली नाही. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत १८३ मि. मि. जास्त पाउस पडलेला आहे. यावर्षीही नेहमीप्रमाणे पडलेल्या पावसाच्या आधारे दरवर्षीप्रमाणे पिकाचे नियोजन केल्यास संभाव्य टंचाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.याचप्रमाणे प्रत्येक गावाने वास्तव चित्र ध्यानात घेवून आपले पाण्याचे नियोजन केल्यास येणा-या संभाव्य पाणी टंचाईला काही अंशी मार्ग काढता येईल. यावेळी या विशेष ग्रामसभेस दिल्लीवरून कॅग महालेखानियंत्रक हरेंद्रसिंह, सुरेंद्रकुमार, राजेश कुमार आदी उपस्थित होते. ग्रामसभेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर