शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

आरक्षणासाठी जामखेडमध्ये वंजारी समाजाचा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 15:44 IST

राज्यातील वंजारी समाजाची संख्या १३ टक्के आहे. आरक्षण मात्र २ टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आता आरक्षणात वाढ करुन १० टक्के करावे, या इतर विविध मागण्यांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता जामखेडमध्ये वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता.

जामखेड :  राज्यातील वंजारी समाजाची संख्या १३ टक्के आहे. आरक्षण मात्र २ टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आता आरक्षणात वाढ करुन १० टक्के करावे, या इतर विविध मागण्यांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता जामखेडमध्ये वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता.  आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी वंजारी समाजाच्या वतीने देण्यात आला. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने समाजबांधव, महिला सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकºयांच्या हातात आरक्षणाचे फलक घेतले होते. त्यावर एकच मिशन वंजारी आरक्षण, आरक्षण आमचे हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, एकच चर्चा वंजारी मोर्चा.. अशा घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकला. आरक्षण कृती समाजाचे नेते सभेत बसलेले होते. तर व्यासपीठावर मार्गदर्शन करणाºया मुली उपस्थित होत्या.  यावेळी सुजाता मुंढे, संस्कृती ठोंबरे, श्रेयस राख, वनश्री मिसाळ, पूनम गोपाळघरे, प्रतीक्षा गिते, नीता दराडे, सुनीता बोडखे, सोनाली वनवे, अविद्या घुले यांनी तडाखेबंद भाषणे केली. राज्यात वंजारी समाजाची ९५ लाखांवर लोकसंख्या असल्याची नोंद आहे. सरकारने जनगणना करुन वंजारी समाजाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव आरक्षण द्यावे, केवळ दोन टक्के आरक्षण असल्याने गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांची एमपीएससी, युपीएससी नोकरी मिळत नाही. त्यामुळे १० टक्के आरक्षण मिळावे, अशी समाजबांधवांची गेल्या अनेक वषार्पासूनची मागणी आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आले. हा मोर्चा समाजाच्या हिताचा असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही अथवा कोणाच्याही विरोधात नाही. समाजातील नेते हे बहुजनांचे नेतृत्व करीत आहेत. ते सध्या वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत बोलत नसले तरी मोर्चा पाहून ते स्वत:ही लढ्यात सहभागी होतील व सरकार आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला.  या मोचार्ला सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेस, जामखेड नगरपरिषद, पंचायत समिती, बाजार समिती, भाजप, घिसाडी समाज, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान आदी संघटनांनी पाठिंबा दिला. 

टॅग्स :Morchaमोर्चाAhmednagarअहमदनगर