शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

निखाऱ्यावरुन चालत ‘त्यांनी’ फेडला नवस

By admin | Updated: July 26, 2014 00:34 IST

तिसगाव : ‘बजरंग बली की जय, हनुमान महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ’ या गगनभेदी घोषणा देत हजारो, महिला पुरुषांसह वृद्धांनी रखरखत्या लालबुंद विस्तवावर चालत जाऊन नवसपूर्ती केली.

तिसगाव : ‘बजरंग बली की जय, हनुमान महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ’ या गगनभेदी घोषणा देत हजारो, महिला पुरुषांसह वृद्धांनी रखरखत्या लालबुंद विस्तवावर चालत जाऊन श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथे नवसपूर्ती केली.रहाडाची अग्नीपूजासरपंच कुशिनाथ बर्डे, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी विठ्ठल कराळे यांच्या हस्ते दुपारी चार वाजता रहाडाची अग्निपुजा झाली. सायंकाळी साडेपाच वाजता निखारे तयार झाल्यानंतर प्रथम मानकरी बाबासाहेब मारूती लोखंडे (वय २५) यांनी अग्नीकुंडला श्रीफळ वाहून निखाऱ्याची वाट चालली. त्याक्षणी समर्थ हनुमानाच्या उत्स्फूर्त घोषणांनी परिसर दणाणला. त्यानंतर रहाड खेळण्यास सुरुवात झाली. नवस पूर्तीबरोबर कुतूहल म्हणून राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शिक्षितांसह युवक, युवतींनी रहाड प्रदक्षिणा घातली.चौथी पिढीधामणगाव, ता.आष्टी येथील लोखंडे घराण्याची रहाडातून प्रथम जाणारी ही चौथी पिढी तर आजचा मानकरी बाबासाहेब लोखंडे यांचे रहाडातून जाण्याचे हे सातवे वर्र्ष आहे. हनुमान देवस्थानचे अध्यक्ष माधवस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील शेकडो युवकांनी यात्रा सुरळीतसाठी परिश्रम घेतले.यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री भजन, कीर्तन असे कार्यक्रम झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)तरीही इजा नाहीरखरखत्या लालबुंद विस्तवांवर चालत जाऊनही काहीही इजा होत नाही हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. त्याची अनुभूती स्पर्धेच्या युगातही राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी घेतली.