शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

नगरकरांना बीड-परळी मार्गाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 26, 2014 00:44 IST

अहमदनगर: रेल्वे अर्थसंकल्पात नेहमीच अहमदनगरच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडतो़ प्रत्येकवेळी थातूरमातूर उपाययोजना केल्यामुळे नगरच्या पदरात निराशाच पडते़

अहमदनगर: रेल्वे अर्थसंकल्पात नेहमीच अहमदनगरच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडतो़ प्रत्येकवेळी थातूरमातूर उपाययोजना केल्यामुळे नगरच्या पदरात निराशाच पडते़ नगरसाठी अर्थसंकल्पात प्रकल्प तर मंजूर होतात़परंतु निधीचा तुटवडा असल्याचे सांगून नवीन प्रकल्प रखडत ठेवण्यात येतात़ याआधी मंजूर झालेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प रखडलाच असून, तुटपुंज्या निधीची तरतूद केल्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागू शकलेला नाही़ त्यामुळे आगामी रेल्वे अर्थसंकल्पात तरी नगरकरांची अपेक्षापूर्ती होऊन काहीतरी ठोस हाती येऊन रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ राज्यात नगर जिल्हा सर्वात मोठा आहे़ या जिल्ह्यात दळणवळणाच्या सोयीसुविधा अपुऱ्या आहेत़ रेल्वे अत्यंत स्वस्त दळणवळणाचे साधन आहे़ रेल्वे मार्गाचा विस्तार करून हा जिल्हा मराठवाडा- विदर्भ आणि पुणे शहराला जोडण्यास वाव आहे़ परंतु नगर जिल्हा अद्यापही मराठवाडा व विदर्भाला जोडण्यात आला नाही़ रेल्वेशी संबंधित लहान प्रश्न आजही प्रलंबित आहेत़ ते यावेळी मार्गी लागतील, अशी आशा आहे़नगर-मनमाड दुसरी रेल्वेलाईननगर ते मनमाड एकच लाईन आहे़ सिंगल लाईन असल्याने रेल्वे वाहतूक वारंवार विकस्ळीत होते़ त्यामुळे नगरच्या प्रवाशाला औरंगाबादला जाण्यास सहा तास लागतात़ त्यामुळे रेल्वेचा विचार न करता इतर वाहनांनी प्रवास करण्यावर भर आहे़ दुसरी रेल्वे लाईन टाकल्यास वेळ वाचणार असून, विना अडथळा रेल्वे धावणार आहे़ नवीन रेल्वे लाईन टाकण्याची मागणी सातत्याने केली जाते़ अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्वासनही दिले जाते़ मात्र अर्थसंकल्पात दुसऱ्या रेल्वे लाईनसाठी तरतूद होत नाही़ त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहेत़ तो यावेळी मार्गी लागेल,अशी नगरकरांना अपेक्षा आहे़नगर- मुंबई रेल्वेलाईन सर्वेक्षण करानगरमधून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे़परंतु नगर ते मुंबई हा प्रवास महागडा आहे़ पण रेल्वे असल्यास कमी खर्चात नगरकर मुंबईला जाऊ शकतात़ रेल्वे सुरू केल्यास महामार्गावरील ताण कमी होईल़ तसेच अपघातही होणार नाहीत़ त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी नगर ते मुंबई रेल्वे सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे़यावेळी किमान या मार्गाचे सर्वेक्षण करण्यास तरी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी नगरकरांना अपेक्षा आहे़पुणे केडगाव काष्टी-नगरचे सर्वेक्षण रखडलेसध्या रेल्वेने पुणे शहरात जायचे असल्यास दौंड वरून जावे लागते़ परंतु या मार्गे पुण्याला जाण्यासाठी बराच वेळ लागतो़ दौंड येथे रेल्वेचे इंजिन बदलावे लागते़ त्यात बराच वेळ जातो़ त्यामुळे पुणे केडगाव काष्टी मार्गे नगर,अशा नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली आहे़ परंतु सर्वेक्षणाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, त्यास गती देऊन पुणे रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करावे,अशी मागणी होत आहे़ नवीन रेल्वे मार्गाने प्रवाशी एक तासात पुण्याला जाऊ शकतात़ नगरशहरासह जिल्ह्यातून मुले पुणे शहरात शिक्षणासाठी जातात़ परंतु नगर ते पुणे रेल्वेगाडीची सोय नाही़ त्यामुळे त्यांना पुणे शहरात राहणे भाग पडते़ तेथे राहण्याचा खर्च सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना परवडणारा नाही़ शिक्षणाचा खर्च वाढतो तो पेलणारा नाही़ त्यामुळे इच्छा असूनही इथेच शिक्षण घ्यावे लागते़ ही रेल्वे सुरू झाल्यास मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल़ तसेच पुणे शहरात नोकरी करणाऱ्यांना जाणे-येणे शक्य होईल़ त्यामुळे पुणे केडगाव- काष्टी-नगर रेल्वे मार्ग सुरू करावा,अशी मागणी होत आहे़नगर-बीड-परळी रेल्वे मार्गमराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला १९९५-९६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली़ नव्या रेल्वे मार्गासाठी शासनाकडून ४६२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले़ पहिल्या टप्प्यात या रेल्वे मार्गासाठी केंद्राने ५० कोटी रुपये दिले होते़ रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, भूसंपादनाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली़ परंतु त्यानंतरच्या काळात या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला नाही़ गतवर्षीच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी देण्यात आलेला ५० कोटी रुपयांचा निधी आघाडी सरकारने गुलबर्गा येथील रेल्वे मार्गाकडे वळविला़ त्यामुळे हा प्रकल्प गत १५ वर्षांपासून रखडला असून, एकूण २५० किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. गेल्या १५ वर्षात केवळ १५ कि़मी़ चे काम पूर्ण झाले असून,उर्वरित २३५ कि़ मी़ रेल्वेलाईनचे काम रखडले आहे़ या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला़ मात्र प्रत्येक अर्थसंकल्पात नगरकरांची उपेक्षाच झाली असून, यावेळी हा प्रकल्प मार्गी लागेल आणि नगर जिल्हा मराठवाडा व विदर्भाला जोडला जाईल, अशी अपेक्षा नगरकरांना आहे़सुरक्षा व्यवस्थेचा अभाव जिल्ह्यातील एकमेव मोठे रेल्वे स्थानक आहे़या रेल्वे स्थानकावर सुरक्षा रक्षक नसतात़ त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे़ रेल्वेत महिला प्रवाशांवर अत्याचार होतात़ तक्रार करूनदेखील पोलीस वेळेवर पोहोचत नाहीत़ रेल्वे स्थानकावर महिलांच्या छेड-छाडीचे प्रकार घडतात़ सर्वसामान्य महिलांना यामुळे प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे़ रेल्वेचा प्रवास असुरक्षित बनला आहे़ महिलांना तर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो़ पोलिसांची कमतरता असल्यामुळे गैरप्रकार वाढले आहेत़ रेल्वे स्थानकावर रेल्वे खात्याने पोलिसांची वाढ करावी़ कारण रेल्वे लुटीचेही प्रकार सर्रास घडतात़ क्रॉसिंगच्या ठिकाणी चोर रेल्वेत घुसतात़ प्रवाशांकडून पैसे, मोबाईल, दागिने घेऊन पोबारा करतात़ रेल्वेत घुसून चोरी करणे त्यांना सहज शक्य होत असल्याने रेल्वे लुटीच्या घटनाही वाढल्या आहेत़ याचा रेल्वे खात्याने गांभीर्याने विचार करावा,अशी मागणी होत आहे़आरक्षण खिडकीरेल्वे स्थानकावर आरक्षण करण्यासाठी खिडकी आहे़ मात्र त्याठिकाणी अपुरे कर्मचारी आहेत़ त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते़ कर्मचारी वाढविण्याची मागणी करण्यात येते़ मात्र त्याची रेल्वे खात्याकडून दखल घेतली जात नाही़ रेल्वे प्रवाशांना रेल्वेची माहिती उपलब्ध नाही़ माहिती सुविधा केंद्र नसल्यानेही माहिती मिळत नाही़ परिणामी प्रवाशांची धावपळ होत असून, त्यांना रेल्वेविषयीची माहिती उपलब्ध होत नाही़ त्यामुळे आरक्षण खिडकी व माहिती केंद्र सुरळीत करण्याची गरज आहे़प्रशासनाचे दुर्लक्षरेल्वे स्थानकात प्रवाशांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. पिण्याचे पाणी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. सुविधा पुरविण्याची मागणी सल्लागार समितीकडून सातत्याने करण्यात येते. मात्र, प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकामधील समस्यांमध्ये एक प्रकारे भरच पडत आहे. तसेच प्रवाशांना माहिती देण्यासाठी कर्मचारी उपस्थित नसतात. अशीही तक्रार आहे. काही अपघात घडल्यास अधिकारी वेळेवर पोहोचत नाहीत. वेळोवेळी संपर्क करुनही अधिकारी उपलब्ध होत नाहीत.अ दर्जा असूनही सुविधांचा अभावनगर रेल्वे स्थानकास अ दर्जा प्राप्त झाला आहे़ हे रेल्वे स्थानक मॉडेल स्थानक आहे़ परंतु त्यानुसार येथील रेल्वे स्थानकावर सुविधा निर्माण करण्यात आलेल्या नाहीत़ प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही़ निवाऱ्यांची सोय नाही़ त्यामुळे प्रवाशांवर बाटली बंद पाणी विकत घेण्याची वेळ येते़ रेल्वे स्थानकावर कमालीची दुर्गंधी आहे़ झाडलोट वेळेवर होत नसल्याने सर्वत्र कचरा पडलेला असतो़ कर्मचारीही प्रवाशांना सहकार्य करत नाहीत़ प्रवाशांची स्थानकावर आल्यानंतर मोठी गैरसोय होत आहे़ नियमानुसार ज्या सुविधा पुरविल्या जातात, त्या सुविधा याठिकाणीही निर्माण कराव्यात़अधिकृत थांब्या अभावी गैरसोय नगर रेल्वे स्थानकातून दिवसभरात रेल्वे जात असतात़ परंतु त्या सर्वच रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत़ परंतु रेल्वे स्थानकावर चैन पुलिंग होते़ त्यामुळे रेल्वे गाडी थांबतेच़ परंतु अधिकृत थांबा दिला जात नाही़ तिकीट बुकिंग नसल्याचे कारण पुढे करून थांबा दिला जात नाही़ प्रत्यक्षात मात्र किमान ५० तिकिटांचे बुकिंग होते़ त्यामुळे पुणे-लखनौ, गौरखपूर यासारख्या रेल्वे इथे थांबत नाहीत़ त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, सर्व मोठ्या रेल्वेंसाठी थांबा देण्यात यावा़कुंभमेळा असल्याने सुरक्षा वाढविण्याची गरजपुढीलवर्षी नाशिक येथे कुंभमेळा सुरू होणार आहे़ कुंभमेळ्यासाठी येणारे भक्त शिर्डी व शिंगणापूर येथे येतील़ त्यामुळे कोपरगाव व नगर रेल्वे स्थानकातील सुरक्षा वाढविण्याची गरज आहे़ त्यादृष्टीने रेल्वे अर्थसंकल्पात काही ठोस तरतुदी करण्याची आवश्यकता आहे़तशी मागणीही रेल्वे सल्लगार समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे़ रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन प्रस्ताव तयार केला आहे़ प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावानुसार सुरक्षेच्यादृष्टीने तरतूद करण्याची मागणी होत आहे़रेल्वेस्थानकावर फुड प्लाझागतवर्षी रेल्वे स्थानकावर फुड प्लाझा उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे़मात्र याविषयी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही़ त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे़ ही गैरसोय टळावी,यासाठी मंजूर फुड प्लाझा उभारण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे़रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे रेल्वे स्थानकात मोठी गर्दी असते़ गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेक प्रकार घडतात़ सर्वसामान्य प्रवाशांना लुटले जाते़ परंतु चोर सापडत नाही़ कॅमेरे बसविल्यास चोर पकडणे शक्य होईल़ कॅमेरे बसविल्यास गैरप्रकारांना आळा बसेल आणि चोऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल़ त्यामुळे नगर रेल्वेस्थानकासह कोपरगाव,श्रीरामपूर येथे कॅमेरे बसविण्यात यावेत़नगर-बीड परळी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करामराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या नगर-बीड आणि परळी मार्गाचे काम रखडले आहे़ मंजुरी मिळूनही हे काम होत नसून, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जात नाही़ रेल्वे खात्याकडून नगरकरांची उपेक्षा होतच आहे़ नगरला चांगले दिवस येतील, अशी तरतूद रेल्वे खात्याने नगर रेल्वे साठी करावी़ नगर बीड परळी रेल्वे मार्ग, पुणे केडगाव काष्टी- नगर रेल्वे मार्ग,हे प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे़- संग्राम जगताप, महापौर तथा सदस्य, रेल्वे सल्लागार समिती अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावीनगर रेल्वे स्थानकास अ दर्जा प्राप्त झाला आहे़ परंतु त्यानुसार सुविधा मात्र मिळत नाहीत़ नगर- बीड- परळी मार्गासाठीचा निधी इतरत्र वळविण्यात आला़ त्यामुळे हे काम रखडले आहे़ परिणामी या रेल्वे मार्गाचा खर्च तीन हजार कोटींच्या घरात गेला आहे़ यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातही तरतूद न झाल्यास खर्चात आणखी भर पडणार आहे़ त्यामुळे शासनाने अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी तरतूद करावी़ तसेच नगर-मनमाड दुसरी रेल्वे लाईन टाकण्यासाठी खर्चाची तरतूद करावी़- हरजितसिंग वधवा, सदस्य, क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीमहिला असुरक्षितरेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था नाही़ स्वच्छतेचा अभाव आहे़ महिला प्रवाशांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे़ रेल्वे स्थानकावर पोलिसांची वाढ करावी, अशी मागणी वेळोवळी करण्यात आली़ मात्र रेल्वे खात्याकडून दखल घेतली जात नाही़ रेल्वे स्थानकावर महिला असुरक्षित आहेत़ महिलांना संरक्षण मिळावे़ प्रवाशांना स्वच्छ पाणी व निवाऱ्याची सोय करण्यात यावी़- नलिनी गायकवाड, सदस्य, रेल्वे सल्लगार समितीरेल्वेशी संबंधित प्रश्न दृष्टिक्षेपातनगर-बीड -परळी मार्गाचे काम रखडलेपुणे केडगाव काष्टी-नगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण रखडलेनगर-मनमाड दुसरी रेल्वे लाईनकडे दुर्लक्षरेल्वे स्थानकावरील सी़सी़ टीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव लालफितीतफुड प्लाझा कागदावरचआरक्षण खिडकीत अपुरे कर्मचारीआरक्षणात गैरप्रकाररेल्वेस्थानकावर अस्वच्छतामोठ्या रेल्वेला अधिकृत थांब्यांचा प्रस्ताव रखडलाअ दर्जा प्राप्त रेल्वे स्थानकाप्रमाणे सुविधा अपुऱ्यारेल्वे पोलीस वाढविण्याचा प्रस्ताव रखडलारेल्वे स्थानकावर अद्ययावत सुविधांचा अभाव