शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

श्वानांसाठी मोडला ‘विठ्ठल’चा संसार!

By admin | Updated: July 24, 2016 23:58 IST

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा ग्रामीण संस्कृतीत मानाचे पान लाभलेल्या पशुंवरील प्रेम एकीकडे लोप पावत असतानाच मढेवडगाव येथील विठ्ठल पांडुरंग साळवे हा पशुप्रेमी श्रीगोंदा तालुक्यात चर्चिला जात आहे़

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदाग्रामीण संस्कृतीत मानाचे पान लाभलेल्या पशुंवरील प्रेम एकीकडे लोप पावत असतानाच मढेवडगाव येथील विठ्ठल पांडुरंग साळवे हा पशुप्रेमी श्रीगोंदा तालुक्यात चर्चिला जात आहे़ या विठ्ठलाचा संसार मोडला तरी त्याने आपले श्वानप्रेम कमी होऊ दिले नाही म्हणूनच तीन श्वान या विठ्ठलाचे जीवनसाथी बनले आहेत़विठ्ठल साळवे याला पत्नी व दोन मुले आहेत़ आठवडे बाजारात भाजीपाला विकून तो उदरनिर्वाह चालवितो़ विठ्ठलला लहानपणापासून श्वानांची आवड होती़ या श्वानप्रेमात तो माणसांना विसरुन जायचा़ विठ्ठलला रस्त्यावर एक कुत्र्याचे पिल्लू सापडले़ विठ्ठलने त्याला घरी आणले, त्याचे संगोपन केले़ या श्वानाला त्याने ‘भाई’ हे नाव ठेवले़ पुढे त्याला ‘राजू’ व ‘दादा’ नावाचे दोन साथीदार आणले़ मात्र, विठ्ठलला पत्नीचे वितुष्ट ओढावून घ्यावे लागले़ पत्नी मुलांसह माहेरी निघून गेली़ आता घरात विठ्ठल आणि त्याचे तीन साथीदार श्वान राहत आहेत़ संसार मोडला तरी विठ्ठल कुत्र्यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे जीव लावत आहे़ विठ्ठल त्यांना दररोज गरम पाण्याने आंघोळ घालतो़ त्यांच्यासाठी पोळी, भाकरी करतो़ श्वानांना खाऊ घातल्याशिवाय तोही जेवत नाही़ विठ्ठल आठवडे बाजाराला गेल्यानंतर हे श्वान घराची राखण करतात़ घरी आल्यानंतर विठ्ठल या श्वानांना घेऊन गावातून फेरफटका मारतो़ रात्रीच्या वेळी विठ्ठल घरात झोपल्यानंतर हे श्वान आपल्या घरधन्याचे संरक्षण करतात़ त्यामुळे विठ्ठल निश्चिंत झोप घेतो़ जीव लावला की पशु माणसांपेक्षा जादा साथ देतात़ मी कधी आजारी पडलो तर माझा ‘भाई’ माझ्याजवळ बसून राहतो़ धकाधकीच्या जीवनात स्वत:ची मुलंही जवळ बसू शकत नाहीत़ हे प्रेम श्वान देऊ शकतात, यातच खरे सुख आहे़ हे तीन श्वानच माझे जीवनसाथी आहेत़-विठ्ठल साळवे.