शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रायल भूदलप्रमुखांची नगर येथील आर्मर्ड कोअरला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 20:50 IST

इस्त्रायल देशाचे भूदलप्रमुख (चीफ आॅफ ग्राऊंड फोर्सेस) मेजर जनरल याकोब बराक यांनी नगर येथील एसीसी अ‍ॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला भेट देत येथील प्रशिक्षण पद्धती व अत्याधुनिक युद्धतंत्राची माहिती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : इस्त्रायल देशाचे भूदलप्रमुख (चीफ आॅफ ग्राऊंड फोर्सेस) मेजर जनरल याकोब बराक यांनी नगर येथील एसीसी अ‍ॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला भेट देत येथील प्रशिक्षण पद्धती व अत्याधुनिक युद्धतंत्राची माहिती घेतली.नगरपासून चार किलोमीटर अंतरावर जामखेड रस्त्यावर आर्मर्ड कोर सेंटर अ‍ॅण्ड स्कूल (एसीसी अ‍ॅण्ड एस) ही लष्करी प्रशिक्षण संस्था आहे. देशातील प्रमुख लष्करी प्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या या संस्थेस मित्रदेशाचे अनेक लष्करी अधिकारी, तसेच शिष्टमंडळ भेट देत असतात. याच पार्श्वभूमीवर इस्त्रायलचे भूदलप्रमुख मेजर जनरल याकोब बराक व त्यांच्या सहा सदस्यांनी बुधवारी (दि. १) आर्मर्ड कोअर सेंटरला भेट दिली. एसीसी अ‍ॅण्ड एसचे कमांडंट मेजर जनरल नीरज कपूर यांनी त्यांचे स्वागत केले. संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत राहिलेले संस्थेचे योगदान, तसेच प्रशिक्षण पद्धतीची माहिती कपूर यांनी शिष्टमंडळाला दिली. याशिवाय आर्मर्ड कोअरमध्ये जवानांना दिले जाणारे अत्याधुनिक युद्ध प्रशिक्षण, रणगाडे, तसेच इतर शस्त्रास्त्रांचे वैशिष्ट्यही बराक यांच्या शिष्टमंडळाने जाणून घेतले. याशिवाय शिष्टमंडळाने प्रसिद्ध रणगाडा संग्रहालयालाही भेट देत पाहणी केली. एसीसीकडून लष्कराला दिल्या जाणाºया उत्कृष्ट प्रशिक्षणाबद्दल बराक यांनी येथील अधिकाºयांचे कौतुक केले. मेजर जनरल नीरज कपूर यांनी बराक यांना रणगाड्याची प्रतिकृती भेट देत त्यांचा सन्मान केला.-----------फोटो - ०२एसीसीएसइस्त्रायलचे भूदलप्रमुख याकोब बराक यांना एसीसी अ‍ॅण्ड एसचे कमांडंट मेजर जनरल नीरज कपूर यांनी रणगाड्याची प्रतिकृती भेट दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndian Armyभारतीय जवान