केडगाव : जयपूर येथे सुरू असलेल्या युवा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सह्याद्री कुस्ती संकुलचा वस्ताद विजय बराटे यांचा विष्णू खोसे याने पराभव करुन रौप्यपदकाची कमाई केली.८६ किलो फ्रीस्टाईलमध्ये त्याने पहिली कुस्ती दिल्लीच्या जितेश सोबत दहा शून्यने जिंकली. दुसरी कुस्ती राजस्थानच्या मोनू सोबत १०- ० ने जिंकली. तिस-या कुस्तीत जम्मू काश्मीरच्या अजयला चितपट केले. अंतिम सामन्यात दीपक पुनीया सोबत ९-४ ने कुस्ती झाली. विष्णू खोसे हा चालू वर्षीचा मैदानी कुस्तीतील क्रमांक एकचा मल्ल असून यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्र स्पर्धेत त्याने अनेक पदके जिंकली आहेत.२० ते २५फेब्रुवारी दरम्यान जयपूर येथे सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नगर जिल्ह्याचा विष्णू खोसे याने रौप्यपदकाची कमाई केली. त्यासाठी त्यांनी ४ कुस्ती जिंकून पदकावर नाव कोरले . विष्णू याची भारतीय कुस्ती संघात एशियन चॅम्पियनशिपसाठी निवड चाचणी होणार आहे .
नगरच्या विष्णू खोसेची कुस्तीत रौप्यपदकाची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:24 IST