शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

निंबोडीच्या ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलुप, नवीन इमारतीची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 13:27 IST

शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त गावक-यांनी गावातील शाळेला कुलूप ठोकले असून नवीन इमारत उभी करेपर्यत मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा निषेध म्हणून ग्रामस्थानी अहमदनगर - बीड राज्यमार्र्गावर दोन तास रास्ता रोको करण्यात आले.

ठळक मुद्देअहमदनगर - बीड राज्यमार्गावर दोन तास रास्तोरोको गावात उभारणार फायबरचे वर्ग 

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त गावक-यांनी गावातील शाळेला कुलूप ठोकले असून नवीन इमारत उभी करेपर्यत मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा निषेध म्हणून ग्रामस्थानी अहमदनगर - बीड   राज्यमार्र्गावर दोन तास रास्ता रोको करण्यात आले. यावेळी आ. शिवाजी कर्डीले, आ. राहुल जगताप, शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, घनश्याम शेलार, संपत म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने रास्तारोकोत सहभागी झाले होते. 

सोमवारी सायंकाळच्या सुमारास शाळेची इमारत कोसळून दुर्घटना घडली. तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गावातील शाळेच्या उर्वरित खोल्यांना कुलुप ठोकण्यात आल्यानंतर अहमदनगर- बीड  राज्यमार्गावर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रास्तोरोकोस सुरुवात केली. तसेच जोपर्यत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत माघार घेणार नसल्याची भुमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी गावात दुसरी शाळा उभारण्याची मागणीही करण्यात आली. तसेच मयतांच्या कुटुबियांना जास्तीत जास्त शासकिय मदत मिळावी. सद्यस्थितीतील शाळा ओढ्याच्या कडेला असल्याने सर्व वर्ग पाडण्यात यावेत. शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन नवीन वर्ग उभारावेत. जखमींचा सर्व खर्च शासनाने करावा, यासह विविध मागण्या यावेळी ग्रामस्थांनी केल्या.

आ.शिवाजी कर्डीले यांनी ग्रामस्थांना रास्तारोको मागे घेण्याचे आवाहन करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. फोनवरुन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी तावडे यांनी गावक-यांच्या सर्व मागण्या मान्य करत असून येत्या आठ दिवसात नवीन शाळेसाठी सर्व मदत करु असे आश्वासन दिले. त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको मागे घेण्यात आला. 

फायबरचे वर्ग उद्यापासून उभारणार दरम्यान ग्रांमस्थांनी शाळेला कुलुप ठोकून विद्यार्र्थी शाळेत न पाठविण्याची भुमिका घेतली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उद्यापासून फायबरचे वर्ग उभारण्यात येणार असल्याचे आ. शिवाजी कर्डीले यांनी यावेळी सांगितले. 

ग्रामस्थांच्या मागण्यामयतांच्या कुटुबियांना जास्तीत जास्त शासकिय मदत मिळावी. सद्यस्थितीतील शाळा ओढ्याच्या कडेला असल्याने सर्व वर्ग पाडण्यात यावेत.गावात सुरक्षित ठिकाणी दुसरी शाळा उभारण्यात यावी.जखमींचा सर्व खर्च शासनाने करावा.