केडगाव : नगर तालुक्यातील इमामपूर येथील जळालेले रोहित्र बदलून मिळत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असूनही महावितरणकडून दुर्लक्ष होत आहे.
इमामपूर येथील शेटे वस्ती येथील म्हसोबा परिसरातील रोहित्र नंबर दोन-तीन महिन्यांपासून जळालेले आहे. वारंवार मागणी करूनही नवीन रोहित्र मिळालेले नाही. रोहित्राअभावी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्याचे अतोनात हाल होत आहेत. येथे अतिरिक्त भार आहे. त्यामुळे नवीन रोहित्र हे १०० एचपीचे मिळावे, अशी मागणी होत आहे.
नविन रोहित्र तत्काळ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य ॲड. बाबासाहेब जरे, शिशूपाल मोकाटे, उल्हास जरे, बंडू मोकाटे, आदिनाथ मोकाटे, प्रशांत जरे, भाऊसाहेब कराळे, देवराम मोकाटे, अशोक मोकाटे यांनी दिला आहे.