शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख मतदार निवडणार गाव कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST

श्रीगोंदा : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून येथे सदस्यपदासाठी ५६७ जागा आहेत. १ लाख २६ हजार ०११ मतदार ...

श्रीगोंदा : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून येथे सदस्यपदासाठी ५६७ जागा आहेत. १ लाख २६ हजार ०११ मतदार गाव कारभारी निवडणार आहेत. यातील तीन ते चार ग्रामपंचायती बिनविरोध होतील, अशी शक्यता आहे. मात्र इतर गावांत स्थानिक आघाड्या समोरासमोर असल्याने तुल्यबळ लढती होतील.

५९ ग्रामपंचायतींपैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आ. बबनराव पाचपुते यांनी बिनविरोध करणाऱ्या गावास १० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. तसेच येळपणे जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांनीही २० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. सध्या निधीपेक्षाही गाव कुणाच्या मागे आहे, याचे ऑडिट करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पॅनल उभे करण्यासाठी जोरदार हालचाली चालविल्या आहेत. ढवळगाव, सारोळा, निंबवी वगळता इतर गावांत बिनविरोधची आशा मावळत चालली आहे.

जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांचे वांगदरी, कोमल वाखारे यांचे हिंगणी गावाच्या निवडणुकीत विरोधी गटाने एकत्र येण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी नेते सर्जिकल स्ट्राईक कशा पद्धतीने करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लिंपणगावमध्ये पाचपुते व नागवडे गटात सरळ सामना होणार आहे. मात्र काही जागेवर बंडखोरी अटळ दिसत आहे.

----

..अन‌् गाव कारभारी सैरभैर

सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निघणार आहे. त्यामुळे अनेक नेत्यांची कोंडी झाली आहे. सरपंचपद गुलदस्त्यात नसल्याने पॅनलचा खर्च कोणी करायचा असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत तालुका पातळीवर राजकारण करणाऱ्या सेनापतींनी तुमच्या गावची निवडणूक तुम्ही पाहून घ्या, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गाव कारभारी सैरभैर झाल्याचे दिसते.