शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गावाने दु:ख केले हलके

By admin | Updated: December 22, 2015 23:11 IST

श्रीरामपूर : विलास रभाजी पटेकर हा ४७ वर्षीय शेतकरी कांदा लागवड करताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला. अन् त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

श्रीरामपूर : विलास रभाजी पटेकर हा ४७ वर्षीय शेतकरी कांदा लागवड करताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला. अन् त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आई देऊबाई, वडील रभाजी, पत्नी सोनाली, सिया व समीक्षा या दोन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या. निर्मलग्राम वडगाव आमलीने हे दु:ख एका कुटुंबाचे न मानता अख्ख्या गावाचे मानून हे दु:ख हलके केले.कोरडेपणाने निव्वळ प्रतिमेला फुले वाहून, श्रद्धांजली वाहून गावकरी थांबले नाहीत. त्यांनी मृत शेतकरी विलासच्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षणासाठी उत्स्फूर्तपणे सुमारे १ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली. हागणदारीमुक्त गाव व निर्मलग्रामचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविलेल्या वडगाव आमली (ता. पारनेर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रभाजी पटेकर यांचा विलास हा एकुलता एक मुलगा. कांद्याची लागवड करताना छातीत दुखू लागले. कामामुळे चमक भरली असेल म्हणून दोघे नवरा- बायको भाळवणीला दवाखान्यात निघाले. मध्येच एक मोटारसायकलस्वार भेटला. त्याने या दोघांना दवाखान्यात पोहोचविले. डॉक्टरांनी तपासले. हृदयविकाराचा झटका असल्याने नगरला हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका बोलावण्यापूर्वीच दुसरा झटका आला. अन् संपूर्ण पटेकर कुटुंबालाच विलासने अखेरचा झटका देत जगाचा निरोप घेतला. आई आजारी बहिणीला भेटायला मुंबईला गेली होती. त्यांच्यासह दूरवरच्या नातलगांना निरोप गेले. मुंबईवाले येता येता पहाटेचे ३ वाजले. आई, बहीण पहाटे ३.३० वाजता पोहोचले. पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत पाहुणे वाट पाहत होते. कोणी शेकोटीचा आधार घेत होते. कोणी सोबतच्या पांघरुणात ऊब शोधत होते. पहाटे ४ च्या सुमारास विलासवर अंत्यसंस्कार झाले. नंतर जलदान विधी (दशक्रिया) झाला. हनुमान मंदिरात अख्खा गाव जमला होता. कार्यक्रमाचं नियोजन सारं गावानेच हाती घेतलं होतं. पटेकर गुरूजींना न सांगता गावानेच अन्नदानाची सोय केली होती. श्रद्धांजलीची भाषणं सुरू झाली. गावातल्या एका ज्येष्ठाने कल्पना मांडली. उपस्थितांनी आपापल्या परीने पटेकर कुटुंबाला नाही तर विलासच्या दोन चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी. पाहता पाहता सुमारे १ लाख रुपयांचा निधी जमा झाला. गावातील ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर, नोकरदार, शेतकरी, महिला अशा साऱ्यांनीच यात खारीचा सहभाग दिला. ही रक्कम विलासच्या सिया व समिक्षा या दोन मुलींच्या नावावर बँकेत एफ. डी. केली जाणार आहे. गावाने एका परिवाराचे दु:ख हलके करताना दु:खाच्या घटनेतूनही समाजासमोर आदर्श निर्माण केला. (प्रतिनिधी)