शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गाव नाही अख्खा नगर तालुका दत्तक घेतोय : खासदार सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 19:08 IST

नगर तालुका टंचाई आढावा बैठकीसाठी प्रशासनाच्या यादीत निमंत्रित असलेल्या पाचही आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

योगेश गुंडकेडगाव : नगर तालुका टंचाई आढावा बैठकीसाठी प्रशासनाच्या यादीत निमंत्रित असलेल्या पाचही आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. तीन आमदारांचा तालुका असलेल्या नगर तालुका टंचाई बैठकीत दांडी मारली. नगर तालुक्याला हक्काचा आमदार नसल्याने त्यांची भिस्त आता खासदारावर आहे म्हणून नगर तालुका मी दत्तक घेत असल्याची घोषणा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.नगर तालुका टंचाई आढावाबैठक आज नगर शहरात डॉ सुजय विखे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी सभापती रामदास भोर, माजी आमदार बबनराव पाचपुते, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, गोविंद मोकाटे, शरद झोडगे, तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी वसंत गारुडकर, पंचायत समिती सदस्य विठ्ठल काळे, दिलीप पवार, गुलाब शंदे, रविंद्र भापकर आदी उपस्थित होते.बैठकीस तालुका प्रशासनाने आमदार शिवाजी कर्डिले, विजय औटी, अरुण जगताप, राहुल जगताप, संग्राम जगताप या पाच आमदारांना निमंत्रित केले होते. त्यांची नावे फलकावर प्रमुख उपस्थितामध्ये टाकण्यात आली मात्र यापैकी कोणीच या बैठकीस उपस्थित राहिले नाही. हाच धागा पकडून डॉ.सुजय विखे म्हणाले, नगर तालुक्याला स्वतंत्र आमदार नाही. यामुळे तालुक्याची सगळी भिस्त आता खासदारावर आहे. मी सरकारी योजनेप्रमाणे गाव दत्तक घेत नसतो तर संपूर्ण तालुकाच दत्तक घेणारा खासदार आहे. यामुळे यापुढे नगर तालुका मी दत्तक घेत आहे.नगर तालुक्यातील ४४ गावांची बु-हाणनगर पाणी योजना जनसेवा फौंडेशनला चालवण्यास देणार आहे. यामुळे या योजनेच्या तांत्रिकदृष्ट्या होणा-या चुका पुन्हा पुन्हा होणार नाही.ज्या गावाने मला सर्वोच्च मताधिक्य दिले. त्या गावाला तीन महिन्यात १५ लाखांचा विकास निधी देणार असून मताधिक्याच्या टक्केवारीनुसार गावांना निधी देण्यास प्राधान्य देणार आहे. छावणी चालकांना झालेला दंड कमी करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. दुष्काळ अनुदानासाठी १० दिवसाची मुदत वाढ देण्यात आली.सरपंच ग्रामसेवक तलाठी यांची आता जबाबदारी वाढली त्यांनी यात लक्ष घालावे असेही खासदार विखे म्हणाले.काम न केलेल्यांची यादी खिशात घेऊन फिरतोयडॉ. सुजय विखे म्हणाले, नगर तालुक्याने मला मोठे मताधिक्य दिले. प्रत्येक गावात माझा माणूस होता. त्यामुळे कोणी काम केले आणि कोणी काम केले नाही यांचा रिपोर्ट मी बंद पाकिटात घेऊन फिरत आहे. उन्हातान्हात फिरलेल्यांची यादी माझ्याकडे आहे. यामुळे कोणी श्रेयवादाच्या लढाईत पडू नका.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर