शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

विजयपूरकर झाले आक्रमक

By admin | Updated: June 16, 2014 00:10 IST

शेवगाव : पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक असलेल्या तालुक्यातील विजयपूर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटून मुक्कामी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून कैफियत मांडली.

शेवगाव : पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक असलेल्या तालुक्यातील विजयपूर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटून मुक्कामी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून कैफियत मांडली.जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी काही सहकारी अधिकाऱ्यांसह पुर्नवसित विजयपुरला मुक्कामी भेट देऊन गावकऱ्यांशी ग्रामसभेच्या माध्यमातून संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनेक तक्रारी मांडल्या. तालुक्याचे ठिकाण असलेल्या शेवगावशी संपर्क साधण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली यांत्रिक बोट पूर्ववत सुरु करावी, गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, एस.टी. ची बस सेवा, पोलीस पाटील व कोतवालाची नियुक्ती, रानडुकरांचा बंदोबस्त, दारुबंदीची प्रभावी अंमलबजावणी, युवकांसाठी क्रीडा मैदान व क्रीडा संकुल, महिला बचत गटांसाठी कर्ज सुविधा या तक्रारींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता. जायकवाडी जलाशयाच्या निर्मितीनंतर विजयपूर गावाचा संपर्क पैठण,लोहगाव, आगरनांदूर असा अंदाजे तीस कि.मी. ने वाढला. नित्याच्या कामासाठी शेवगावला जाणे-येणे अडचणीचे ठरत असल्याने आमच्या गावाचा समावेश शेवगाव तालुक्यातच कायमस्वरुपी करावा, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. दळणवळणाच्यादृष्टीने यांत्रिकी बोट व बोटसेवेच्या मागणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले. माजी सरपंच नानासाहेब जगदाळे, काकासाहेब काळे, दत्तात्रय काळे, श्रीमंत जगदाळे, रामदास काळे, अशोक सुरोसे,जनाबाई जगदाळे यांनी विविध प्रश्न मांडले.(तालुका प्रतिनिधी)दळणवळणाचा प्रश्न गंभीर विजयपूर दहिगाव-ने पासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावरील गाव. मात्र जायकवाडी धरणाच्या निर्मितीमुळे या दोन्ही गावांमध्ये जलाशयाच्या पाण्यामुळे अंतराचा अडसर निर्माण झाला. अंतरात तीस कि.मी. ने वाढ झाली. आता पैठणला वळसा घालून लोहगाव आंगरनांदूर मार्गे विजयपूरला जावे लागते. गोदावरी नदीत कायम स्वरुपी पाणी असते. परंतु बोटसेवा नसल्याने दळणवळणात अडचण येते. सात वर्षापूर्वी माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या प्रयत्नातून बोटसेवा सुरु झाली. परंतु बोट नादुरुस्त झाल्याने ही सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे गावाचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर आहे.