शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

...असे झाले कुलगुरू ‘क्वारंटाईन’; अमेरिका दौरा : निगेटिव्ह आल्यानंतर घरी निगराणीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 13:15 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरराज्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू अमेरिका दौ-याहून परतल्यानंतर स्वत: क्वारंटाईन होण्याऐवजी अनेकांना भेटले. अखेर जिल्हा प्रशासनाने त्यांचा शोध घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. जेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तेव्हा त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु घरीही ते प्रशासनाच्या निगराणीखाली आहेत. 

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरराज्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू अमेरिका दौ-याहून परतल्यानंतर स्वत: क्वारंटाईन होण्याऐवजी अनेकांना भेटले. अखेर जिल्हा प्रशासनाने त्यांचा शोध घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. जेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तेव्हा त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु घरीही ते प्रशासनाच्या निगराणीखाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एका कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व त्यांचे अधिष्ठाता हे दोघे अमेरिकेतून एका परिषदेला उपस्थित राहून मंगळवारी परतले. भारतात परतल्यावर त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के  मारण्यात आले होते. असे असूनही या दोघांनी मुंबई ते पुणे आणि पुणे ते नगर असा प्रवास केला. त्यानंतर त्यांच्या विद्यापीठातही त्यांनी काही बैठका घेतल्या. दरम्यान नगर जिल्हा प्रशासनाला परदेशातून आलेल्या या दोघांची माहिती मिळाली. जिल्हा प्रशासनाने त्यांना क्वारंटाईन होण्याची विनंती केली. मात्र कुलगुरूंनी ती गांभीर्याने घेतली नाही. शेवटी जिल्हा प्रशासनाला आपला अधिकार वापरत त्यांना क्वारंटाईन करावे लागले. त्या दोघांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. जेव्हा हे अहवाल निगेटिव्ह आले. तेव्हा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. आता हे कुलगुरू व अधिष्ठाता ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये असल्याचे समजते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याuniversityविद्यापीठ