शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहने सावलीत, ग्राहक उन्हात; वाळकी येथील सेंट्रल बँकेसमोरील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 16:33 IST

‘वाहने सावलीत अन ग्राहक उन्हात’ अशी परिस्थिती नगर तालुक्यातील वाळकी येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पहावयास मिळत आहे.

अहमदनगर : कोरोनामुळे लॉकडाऊन काळ सुरु असला तरी आर्थिक व्यवहार मात्र थांबवता येत नाहीत. यासाठी सर्वसामान्य ग्राहक पैशासाठी बँक गाठतात. या काळात बँका ग्राहक ांची काळजी घेण्यापेक्षा स्वत:च्या वाहनांची काळजी घेताना दिसत आहेत. ‘वाहने सावलीत अन ग्राहक उन्हात’ अशी परिस्थिती नगर तालुक्यातील वाळकी येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पहावयास मिळत आहे. नगर तालुक्यातील वाळकी हे मोठ्या लोकसंख्येचे बाजारगाव. या गावात सेंट्रल बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत परिसरातील गावामधील शेतकरी तसेच निवृत्त पेन्शनधारकांचे खाते आहेत. या शाखेत राळेगण, गुंडेगाव, देऊळगाव सिध्दी, खडकी, वडगाव-तांदळी,  बाबुर्डी यासह विविध गावातील नागरिकांची ये-जा बँकेत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेत कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही.  येणा-या ग्राहकांना रस्त्यावर उन्हात उभे केले जात आहे. त्यांना उभे राहण्यासाठी कसल्याही प्रकारच्या सावलीचीही सोय बँकेने अथवा ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे ग्राहकांना उन्हातच उभे राहावे लागत आहे. बँकेच्या इमारतीच्या सावलीमध्ये ग्राहक उभे राहू शकतात, मात्र या सावलीमध्ये बँकेचे अधिकारी-कर्मचारी दुचाकी उभ्या करतात. त्यामुळे ग्राहकांना नाविलाजाने उन्हात उभे राहावे लागत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाकोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याची गरज आहे. मात्र रांगेत उभे राहताना  कसल्याही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. बँकही कसल्याही प्रकारची खबरदारी घेत नाही. रस्त्यावर खडूने ओबडधोबड रेषा ओढल्या आहेत. यापलीकडे बँकने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. जेष्ठ नागरिकांचे हालपरिसरातील गावातून जेष्ठ नागरिक बँकेत येतात. मात्र या नागरिकांना बँक रांगेत उभे करीत आहेत. त्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे गेल्याने जेष्ठानांही त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्र