शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुलकर्णी यांना वेदभूषण, तर लोणकर यांना समाजभूषण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST

पाथर्डी : श्री लक्ष्मी नृसिंह प्रतिष्ठान व सार्वजनिक गणेश मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डीतील श्रुती माऊली वेदपाठशाळेचे प्रा. ...

पाथर्डी : श्री लक्ष्मी नृसिंह प्रतिष्ठान व सार्वजनिक गणेश मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डीतील श्रुती माऊली वेदपाठशाळेचे प्रा. वेदमूर्ती सर्वेश्वरशास्त्री कुलकर्णी यांना वेदभूषण, तर दौंड तालुक्यातील केडगाव येथील स्वा. सावरकर युवा विचार मंचचे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजात निरपेक्षतेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. कसबा पेठेतील प्राचीन उजवी सोंड असणाऱ्या गणेश मंदिराच्या जीर्णोद्धार पुस्तिकेचे प्रकाशन व भूमिपूजन मुकुंदकाका जाटदेवळेकर, माधवबाबा, वास्तू विशारद अजय कुलकर्णी, दादाजी आगटे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अंकुश पालवे, नितीन एडके, राहुल कारखेले यांच्या हस्ते कार्यास प्रारंभ करण्यात आला.

श्री लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन श्रीमद्‌भगवतगीता पाठांतर स्पर्धेतील विजेती प्रतिभा शेळके, मन केला, मीत केला, मंजूषा अगस्ते, सुलभा श्रोत्रीय आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी १५० महिलांची रक्त तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या सर्व महिलांचा फ्री चेक अप व फ्री ट्रीटमेंट श्री धन्वंतरी चिकित्सालयातर्फे करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. ज्योती देशमुख यांनी दिली.

प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीधर देशमुख, स्वागत गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदजी महाराज, सन्मानपत्राचे वाचन अविनाश मंत्री तर डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी आभार मानले.

यावेळी नगरसेवक बंडू बोरुडे, महेश बोरुडे, डॉ. दिगंबर भराट, जगदीश मुने, राजेंद्र भोसले, संतोष लबडे, गणेश सोनटक्के, रमण लाहोटी, अजिनाथ कर्डीले आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल मुळे, सचिन रत्नपारखे, मंजिरी घायाळ आदींनी परिश्रम घेतले.

फोटो : २४ पाथर्डी

पाथर्डी येथे प्रा. वेदमूर्ती सर्वेश्वरशास्त्री कुलकर्णी यांना वेदभूषण तर डॉ. नीलेश लोणकर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले.