जामखेड : तालुक्यातील चौंडी येथे मंगळवारी होत असलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे उपस्थित राहणार आहेत़ चौंडी हे अहिल्याबार्इंचे जन्म ठिकाण असल्याने येथे दरवर्षी होणाऱ्या जयंती सोहळ्याला राज्यासह देशभरातून धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहतो़ यंदा पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा होत असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे़ कार्यक्रमस्थळी एक लाख माणसे बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे़ हा सोहळा सर्वपक्षीय होत असल्याचे जाहीर करण्यात आले असून, मंत्री शिंदे नियोजनासाठी चौंडीत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत़ दरम्यान, चार दिवसांपूर्वी पालकमंत्री शिंदे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धनगर समाज प्रतिनिधींची बैठक घडवून आणत बहुतांशी प्रलंबित मागण्यांना हिरवा कंदील मिळविला आहे़
वसुंधराराजे आज चौंडीत
By admin | Updated: May 30, 2016 23:54 IST