शेवगाव : शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत मनसेच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी सभापती अरूण लांडे, संजय फडके, पवनकुमार साळवे, सुनील रासने, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, उपजिल्हा अध्यक्ष गोकुळ भागवत आदींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मनसेच्या वतीने शहरातील निराधार कर्करोगाने पीडित असलेल्या भामाबाई कुसळकर यांना ११ हजार रूपयांची रोख स्वरूपात मदत करण्यात आली. रोटरी क्लबच्या वतीने हाॅस्पिटलचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी रोटरी क्लबचे बाळासाहेब चौधरी, प्रा. किसनराव माने यांनी घेतली आहे. शहरातील दुर्लक्षित असलेल्या डोंबारी वस्तीतील मुलांना वह्या, पाट्या, पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्याचे वाटप गणेश रांधवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
विविध ठिकाणच्या कार्यक्रमात प्रशांत भराट, राहुल सावंत, गणेश डोमकावळे, ज्ञानेश्वर कुसळकर, दिलीप सुपारे, दीपेश पिटेकर, संजय वणवे, संदीप देशमुख, देविदास हुशार, रामेश्वर बलिया, संजय बडे, विठ्ठल दुधाळ, अभिजीत शेळके, निवृत्ती आधाट, बाळा वाघ, अमिन सय्यद, विनोद ठाणगे पाटील, सोमनाथ आधाट, राजू चव्हाण, बाळासाहेब शित्रे, सावता पुंड, मंगेश लोंढे, गणेश बहुधने, सुरज कुसळकर, विजय धनवडे, भाऊ बैरागी, बाळासाहेब फटांगरे आदी उपस्थित होते.
---
३१ शेवगाव शिवजयंती
शेवगाव येथे मनसेच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.