पारनेर : उच्चशिक्षित तसेच सामाजिक भान असलेल्या संचालक मंडळामुळे वैष्णवीमाता पतसंस्थेचा कारभार सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करील, असा विश्वास आमदार निलेश लंकेे यांनी व्यक्त केला.
वनकुटे येथील वैष्णवीमाता महिला पतसंस्थेचे आमदार लंके यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, पिंपळगाव रोठ्याचे सरपंच अशोक घुले, वनकुट्याचे सरपंच अॅड. राहुल झावरे, उद्योजक देवराम गागरे, डॉ. बाळासाहेब कावरे, पळशीचे उपसरपंच अप्पासाहेब शिंदे, नारायणशेठ बिलबिले, राजूभाऊ रोडे, संदीप ठाणगे, डॉ. सांगळे, फिरोज हवालदार, मोहन शिंदे, रामदास शेलार, सुरेश गागरे, विकास गागरे, कानिफ लोणकर, टायगर शेख, बाळासाहेब खामकर, रामदास साळवे, राजू डहाळे, आदीनाथ ढवळे, बंटी बुचूडे, अर्जुन कुलकर्णी, कैलास मुसळे, संस्थेच्या अध्यक्ष अॅड. स्नेहा झावरे, उपाध्यक्ष तबस्सूम हवालदार, इंजि. अर्चना देशमुख, डॉ. शारदा सांगळे, सुनीता लोणकर, श्रामिनी चौधरी, रोहिणी कुलकर्णी, कमिनी शिंदे, विद्या गागरे, शांता शेलार, कांताबाई पोकळे उपस्थित होते..
लंके म्हणाले, संस्थेचे संचालक मंडळ उच्चशिक्षित आहे. त्यांना सामाजिक जाणीव आहे. संस्थेचा व्यवस्थापकही आदर्श आहे. त्यामुळे संस्थेचा कारभार आदर्श असेल. तो सहकारी क्षेत्रासाठी पथदर्शक ठरेल. पतसंस्थेची नोंदणी करून ती सुरू करणे सोपे काम आहे. परंतु कारभार करणे अवघड असते. वनकुटे गावासाठी विविध विकासकामांच्या माध्यमातून ८० ते ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पठारवाडी रस्त्याच्या कामासाठी ५० लाख, हनुमाननगर वसाहत पाणीपुरवठ्यासाठी ३१ लाख तसेच भुलदऱ्यातील शाळा खोल्यांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे लंके यांनी सांगितले. (वा.प्र.)
फोटो आहे