शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव पान ग्रामपंचायतीत अडीच लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 17:16 IST

ग्रामपंचायत निधीमधील १ लाख ४७ हजार ६३ रुपये व पाणीपुरवठा निधीतील ७४ हजार असे एकूण २ लाख ४९ हजार ६५२ रुपयांचा प्रमाणकाशिवाय अपहार केल्याचे पंचायत समितीचे विस्ताराधिकारी एस.एल. डोखे यांनी केलेल्या चौकशीत प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

वडगाव पान : संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या वडगाव पान ग्रामपंचायतीचे तत्कालिन प्रभारी ग्रामसेवक डी. एस. नवले यांनी अडीच लाख रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास संगमनेर पंचायत समितीकडून टाळाटाळ सुरू आहे.२६ नोव्हेंबर २०१५ ते १० मार्च २०१६ या तीन महिन्यांच्या काळात नवले यांच्याकडे वडगाव पान ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार असताना त्यांनी ग्रामपंचायत निधीमधील १ लाख ४७ हजार ६३ रुपये व पाणीपुरवठा निधीतील ७४ हजार असे एकूण २ लाख ४९ हजार ६५२ रुपयांचा प्रमाणकाशिवाय अपहार केल्याचे पंचायत समितीचे विस्ताराधिकारी एस.एल. डोखे यांनी केलेल्या चौकशीत प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यानुसार संगमनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ५७ च्या पोटकलम (३) नुसार ग्रामनिधी व ग्राम पाणीपुरवठा निधी व ग्रामपंचायतीच्या नावे वेळोवेळी मिळणा-या इतर रकमांच्या सुरक्षित अभिरक्षेसाठी पाणीपुरवठा समितीचे सचिव व सरपंच हे संयुक्तपणे जबाबदार असतील, अशा आशयाच्या नोटिसा संबंधितांना बजावल्या. परंतु आर्थिक अपहार होऊन एक वर्ष उलटले असतानाही आतापर्यंत पंचायत समितीने या ग्रामसेवकाच्या अपहाराची दखल घेतलेली नाही. तत्कालीन सरपंच शोभा यशवंत थोरात यांनी कारवाईसाठी वेळोवेळी गटविकास अधिका-यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु आतापर्यंत नवले यांच्याविरुद्ध गटविकास अधिका-यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.तत्कालीन सरपंच थोरात यांनी वेळोवेळी गटविकास अधिका-यांना नवले यांच्या कार्यकाळातील आर्थिक अपहाराची त्वरित चौकशी करण्यात यावी, असे लेखी पत्र देऊनदेखील पंचायत समिती कार्यालयामार्फत जाणीवपूर्वक चालढकल केली जात आहे.तसेच वाडगाव पानच्या ग्रामसभेत वेळोवेळी हा विषय चर्चिला गेला. तसेच त्याचा अहवाल पंचायत समितीस पाठविण्यात आला आहे. पण पंचायत समितीकडून याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCorruptionभ्रष्टाचारgram panchayatग्राम पंचायत