देवटाकळी येथे ३० ऑगस्ट रोजी मराठी शाळेत लसीकरण झाले. यावेळी लस घेण्यासाठी ग्रामस्थांनी एकाच वेळी मोठी गर्दी केली. यावेळी बहुतांशी जणांनी मास्क घातलेले नव्हते. आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत. ग्रामपंचायत सहकार्य करत नाही. लसीकरणाच्या दिवशी ग्रामसेवकही उपस्थित नव्हते. त्यामुळे नियोजन झाले नसल्याने गर्दी झाली, असे येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी लसीकरणादरम्यान झालेली गर्दी पाहून सरपंच अनिता खरड, उपसरपंच अशोक मेरड यांनी हस्तक्षेप करत, ग्रामस्थांना मार्गदर्शन करत गर्दी न करण्याचे आवाहन केले.
---------------------
निर्बंध लागू केल्याने रुग्णसंख्या घटली
देवटाकळी येथे मागील वीस दिवसांपूर्वी १५ कोरोनाबाधित रुग्ण होते. ग्रामपंचायतीने निर्बंध लागू केल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली. सध्या गावात अवघे पाच रुग्ण आहेत. मात्र, लसीकरणादरम्यान गर्दी झाली, तर पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची भीती असल्याने, पुढील वेळी नियोजन करून लसीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
फोटो ०१ देवटाकळी
देवटाकळी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणादरम्यान झालेली गर्दी.