शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य,सार्वजनिक जागा, कामाची जागा, उत्पादक आस्थापनेवर पाळा सोशल डिस्टन्सिंग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 20:24 IST

अहमदनगर : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना केल्या असून त्या जिल्हावासियांनी अंमलात आणाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सार्वजनिक जागेवर मास्क वापरावे, तसेच कामाची जागा, उत्पादक आस्थापना या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना केल्या असून त्या जिल्हावासियांनी अंमलात आणाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सार्वजनिक जागेवर मास्क वापरावे, तसेच कामाची जागा, उत्पादक आस्थापना या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हाधिकाºयांनी केल्या आहेत. त्याचेच पालन व अंमलबजावणी करण्याबाबत सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत. सार्वजनिक  ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य असून  सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये, विवाह व अंत्यसंस्कार या ठिकाणी गर्दी होणार नाही याचे नियमन करावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयास संबंधित प्राधिकरणाने दंडात्मक शिक्षा करावी, दारू, गुटखा, तंबाखू विक्रीवर बंदी असल्याने त्याचे सक्तीने पालन करावे, असे या आदेशात म्हटले आहे.  सर्व कामाच्या ठिकाणी तापमान तपासणीसाठी पुरेशी व्यवस्था करावी व सॅनिटायझर पुरवावेत, हात धुण्याच्या ठिकाणांची संख्या वाढवावी, कामाच्या ठिकाणी शिफ्टदरम्यान तासाभराचे अंतर ठेवावे, तसेच कर्मचाºयांच्या जेवणाच्या वेळा ठरवून द्याव्यात, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती व ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांना घरून काम करण्यास प्रोत्साहित करावे. सर्व खासगी व सार्वजनिक कर्मचारी यांना आरोग्य सेतूच्या वापरास प्रोत्साहित करावे, सर्व संस्थांनी त्यांच्या कामाची जागा शिफ्टदरम्यान स्वच्छ करावी,  मोठी संमेलने, बैठका प्रतिबंधित कराव्यात, असे यातून सूचवण्यात आले आहे.  -------------उत्पादक आस्थापनांनी हे करावेउत्पादन आस्थापनाच्या ठिकाणी हाताळण्यात येणाºया पृृष्ठभागाची वारंवार साफसफाई करावी व सर्वांना हात घुणे अनिवार्य करावे. कॅन्टीनमध्ये भोजनांच्या वेळात अंतर ठेवावे. चांगल्या स्वच्छता पद्धतीबाबत (गुड हायजिन प्र्रॅक्टिसेस) सखोल संवाद व प्रशिक्षण आयोजित करावे.