शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

अर्बन बँक फसवणूक प्रकरणी तत्कालीन संचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST

अहमदनगर/पिंपरी : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची २२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. ६) बँकेच्या ...

अहमदनगर/पिंपरी : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची २२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. ६) बँकेच्या एका तत्कालीन संचालकासह दोन आरोपींना अटक केली आहे. पिंपरीतील मोरवाडी न्यायालयात त्यांना हजर केले असता दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत (दि. ९) पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात बँकेचे तत्कालीन संचालक माजी खासदार दिलीप गांधी यांचीही चाैकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

नवनीत शांतीलाल सूरपुरिया (रा. अहमदनगर), तसेच यज्ञेश बबन चव्हाण (रा. संभाजीनगर, चिंचवड) अशी शनिवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (५६, रा. अहमदनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली आहे. बँकेच्या चिंचवड येथील शाखेत २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजुदेवी हरिमोहन प्रसाद (सर्व रा. चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी), अभिजित नाथा घुले (रा. अहमदनगर) यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य, तसेच नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना बँकेच्या प्रशासकांनी प्राधिकृत केले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मे. नेश लिब टेक्नोरिअल व मे. इंडियन इंजिनिअरिंग इंडस्ट्रिज पुणे या फर्मचे कर्जदार आरोपी यांनी संगनमत करून स्वत:च्या फायद्यासाठी कर्जप्रकरण केले. त्यासाठी तारण गहाण मिळकतीचा बनावट मूल्यांकन अहवाल दिला. कर्ज उपसमिती सदस्य व बँकेच्या संचालक सदस्यांनी तो अहवाल स्वीकारून बँकेची २२ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी पहाटे अहमदनगर येथे रवाना झाले. आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अहमदनगर येथून बँकेचे तत्कालीन संचालक नवनीत सूरपुरिया यांना अटक केली. तसेच चिंचवड येथे आरोपी यज्ञेश चव्हाण याला अटक केली. माजी खासदार दिलीप गांधी हे बँकेचे तत्कालीन संचालक असून, त्यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात ही फसवणूक झाली आहे. त्यामुळे याप्रकरणात त्यांचीही चाैकशी होईल, असे पोलीस निरीक्षक बाबर यांनी सांगितले.