बांधिलकीचे अनोखे व्रतशेवगाव : शेवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सुधीर कंठाळी यांनी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा केलेला संकल्प ३६ व्या वेळी रक्तदान करून पाळला. सामाजिक बांधिलकीचे अनोखे व्रत जपताना या शिक्षकाने समाजासमोर कृतियुक्त आदर्श ठेवला आहे.कंठाळी संपर्कातील प्रत्येकाला रक्तदानाचे महत्व समजून देतात. अनेक मित्रांना त्यांनी रक्तदाते बनवले. त्यापैकी अनेकांनी अनेकदा गरजूंना रक्तदान करून त्यांचे प्राण वाचवले आहेत. मित्राचा बेचाळीसावा वाढदिवस साजरा करताना शीतल गोरे, सतीश आव्हाड, गोरक्ष बर्डे, सुरेश पोंढे, किरण शिंदे, दीपक पाठक, संजोग कडू, सचिन गांगुली, नाना गवळी, समीर सातपुते, राजू घुगरे यांनीही नगर येथील जनकल्याण रक्तपेढीत मित्रासोबत रक्तदान करून मैत्रीचे अनोखे बंधन बांधले आहे. कंठाळी यांनी वाढदिवसानिमित्त रक्तपेढीला दोन हजार रुपयांची देणगी दिली. त्यांनी ५१ वेळा रक्तदान करण्याचा संकल्प केला असून त्यांना वाढदिवसानिमित्त रक्तपेढीचे अधिकारी गुलशन गुप्ता, रामदास सावंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्ताची गरज देशभरात ६० टक्के स्रियांना असते, परंतु रक्तदान मात्र ७ टक्के स्त्रियाच करतात. स्री-पुरुष समानतेच्या युगात हे चित्र विरोधाभासी आहे. स्रियांनी रक्तदानात अग्रेसर होण्यासाठी त्यांच्यात जागृती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कंठाळी यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
बांधिलकीचे अनोखे व्रत
By admin | Updated: June 30, 2016 01:19 IST