शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाळू ठेक्यांच्या निविदेतच घोटाळा

By सुधीर लंके | Updated: April 20, 2018 12:52 IST

वाळू ठेक्यांचा लिलाव काढताना लिलावातील सहभागाची आॅनलाइन नोंदणीची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केल्याचा अजब नमुना नगरला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे ठराविक वाळू ठेकेदारांसाठी प्रशासनच निविदा ‘मॅनेज’ करते की काय? असा संशय निर्माण झाला आहे. यात थेट अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-याच्या कारभाराबाबतच प्रश्नचिन्ह आहे.

ठळक मुद्देभानुदास पालवे, बामणे संशयाच्या भोव-यातवाळूच्या निविदांची तारीख संपल्यावर जाहिरातींचा फार्सबारा दिवसांत निविदेच्या तब्बल तीन फेऱ्या

सुधीर लंकेअहमदनगर : वाळू ठेक्यांचा लिलाव काढताना लिलावातील सहभागाची आॅनलाइन नोंदणीची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केल्याचा अजब नमुना नगरला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे ठराविक वाळू ठेकेदारांसाठी प्रशासनच निविदा ‘मॅनेज’ करते की काय? असा संशय निर्माण झाला आहे. यात थेट अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-याच्या कारभाराबाबतच प्रश्नचिन्ह आहे.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने राहुरी, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांतील सहा वाळूसाठ्यांचे लिलाव देण्यासाठी मार्च महिन्यात निविदा प्रसिद्ध केल्या. पहिल्या फेरीच्या लिलावाची जाहिरात १६ मार्चला प्रसिद्ध झाली. त्यास प्रतिसाद मिळाला नाही, असे कारण दाखवत हीच निविदा तीन फेºयांत प्रसिद्ध केली गेली. प्रत्येक फेरीत निविदा दाखल करण्यासाठी केवळ एक-दोन दिवसांचा कालावधी दिला गेला.१६ मार्च ते २७ मार्च या अवघ्या बारा दिवसांत प्रशासनाने निविदेच्या तब्बल तीन फेºया केल्या. एवढी घाई कशासाठी हा प्रश्न यातून निर्माण होतो. तिस-या फेरीतील निविदेची जाहिरात तर निविदा प्रक्रियेतील सहभागासाठीची आॅनलाइन नोंदणीची मुदत संपल्यानंतर प्रसिद्ध केली गेली. या नोंदणीशिवाय ठेकेदार पुढील कुठलीही प्रक्रियाच करू शकत नाही. तिस-या फेरीत या नोंदणीसाठी २७ ते २८ मार्च अशी मुदत होती. मात्र निविदेची जाहिरात एका कमी खपाच्या दैनिकात थेट २९ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली. अन्य दोन दैनिकांत ती २८ मार्चला दिली गेली. जाहिरातच उशिरा प्रसिद्ध झाल्याने २७ व २८ या तारखांना ठेकेदार नोंदणीच करू शकत नव्हते. असे असतानाही या लिलावाची प्रक्रिया झाली व राहुरी तालुक्यातील जातपचा लिलाव दिला गेला. अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या नावाने निविदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. ही प्रक्रियाच संशयास्पद बनली आहे.या सर्व जाहिराती ठराविक वृत्तपत्रांतच प्रसिद्ध झालेल्या दिसतात. अवघ्या बारा दिवसांत निविदांच्या तीन फे-यांचा घाईघाईने खटाटोप कशासाठी? निविदा दाखल करण्यासाठी केवळ एक-दोन दिवसांचा कालावधीच का दिला जातो? असे प्रश्न या प्रक्रियेत निर्माण झाले आहेत.खनिकर्म अधिकारी बामणेंचे मौननद्यांमध्ये पाणी असतानाही राहुरी, कोपरगाव येथे वाळूउपसा सुरू आहे. याबाबत बामणे यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता ‘मी बैठकीत आहे,’ असे कारण देत त्यांनी उत्तर देणे टाळले. वाळूचे लिलाव काढतो असा दिखावा करायचा व प्रत्यक्षात लिलावच होऊ नयेत असे प्रयत्न करायचे? ही प्रशासनाची चाल तर नाही ना? असा संशय निर्माण झाला आहे. अधिकृत लिलाव जात नसल्याने अवैध उपसा राजरोस सुरू आहे. प्रशासनही त्याकडे सोयीने दुर्लक्ष करते.भानुदास पालवे निरुत्तर४निविदांची नोंदणी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध होणे आवश्यक आहे, हे भानुदास पालवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मान्य केले. मात्र, तिस-या फेरीतील निविदा प्रक्रियेची आॅनलाइन नोंदणीची मुदत २७ व २८ मार्च असताना जाहिराती मात्र २८ व २९ मार्चला प्रसिद्ध करण्यात आल्या याकडे लक्ष वेधले असता पालवे यांनी काहीही उत्तर दिले नाही. ‘आपणासह बडे अधिकारी वाळू ठेकेदारांच्या सोयीचे निर्णय घेत आहेत का?’ या प्रश्नावर त्यांनी फोनच बंद केला.

 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारी