शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोहट्याच्या सरपंचावरील ‘अविश्वास’ मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 13:27 IST

तालुक्यातील मोहटे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. हर्षवर्धन साहेबराव पालवे यांच्यावर ९ पैकी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कामात सरपंच विश्वासात घेत नसल्याने ग्रामपंचायतीचे कामे खोळबून विकास खुंटला असल्याचे करणे देत मंगळवारी अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव आज सकाळी ७ विरुध्द ० मतांनी मंजूर करण्यात आला.

पाथर्डी : तालुक्यातील मोहटे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. हर्षवर्धन साहेबराव पालवे यांच्यावर ९ पैकी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कामात सरपंच विश्वासात घेत नसल्याने ग्रामपंचायतीचे कामे खोळबून विकास खुंटला असल्याचे करणे देत मंगळवारी अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव आज सकाळी ७ विरुध्द ० मतांनी मंजूर करण्यात आला.पाथर्डी तालुक्यातील मोहटे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. निवडणुकीनंतर सरपंचपदावरून गेली तीन वर्षापासून डॉ. हर्षवर्धन पालवे हे काम पाहत होते. मोहटे गावात गेली दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनसाठी रस्ते उकरून ठेवले आहेत, परंतु काहीच काम झाले नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मोहटे ग्रामपंचायतीचा ११ लाखांचा दलित वस्ती विकास निधी अखर्चित राहून मागे गेल्याने पंधरा दिवसापूर्वी गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी सरपंच डॉ. पालवे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना ‘ग्रामपंचायत बरखास्त का करण्यात येवू नये’ अशी नोटीस पाठवली होती. त्यामुळे सरपंच डा.ॅ पालवे यांच्या वरील नाराजी वाढली होती.ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यापैकी ७ सदस्यांनी डॉ. हर्षवर्धन साहेबराव पालवे हे ग्रामपंचायत सदस्याना विश्वासात न घेता मनमानी करून मोहटे गावाच्या विकासाठी ठरवलेली विकासात्मक ध्येय धोरणांचा जाणीव पूर्वक भंग केला आहे. गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नदी खोलीकरण, अंतर्गत रस्ते विकास याबाबत प्रयत्न केले नाहीत. गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून ग्रामसभेने घेतलेले ठराव डॉ. पालवे यांनी स्वत:च्या मनाने बदल केले. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत शासनाच्या विविध विकास योजनेपासून गावातील गरिबांना वंचित ठेवले. विविध शासकीय योजना व वित्त आयोगानुसार मजूर निधीची इतर ग्रामपंचायत सदस्यांना माहिती दिली नाही. दलित वस्ती अंतर्गत आलेला निधी खर्च करण्यासाठी ई निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यामुळे ११ लाखा रुपयांचा निधी शासनाला परत गेला असल्याने डॉ. हर्षवर्धन पालवे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणल्याचे सदस्यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य आसाराम देवराम दहिफळे, नंदाबाई भास्कर दहिफळे, उपसरपंच दत्तात्रय लक्ष्मण दहिफळे,प् ाारूबाई भागवत दहिफळे, आशाबाई बाबासाहेब दहिफळे, अविनाश मुरलीधर फुंदे, ललिता इंदुलाल सोनवणे यांनी मंगळवारी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. याबाबत आज सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालय मोहटे येथे तहसीलदार यांच्या उपस्थितीत अविश्वासाच्या बाजूने ७ विरुद्ध ० असे मतदान होवून अविश्वास ठराव बहुमताने संमत झाला. सरपंच डॉ. हर्षवर्धन पालवे व ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई पांडुरंग दहिफळे हे ठरावाच्या वेळी गैरहजर होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी