गुरुवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बाळासाहेब घोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हतारदेव जाधव, पोलीस नाईक महेंद्र सहाणे, चालक पोलीस नाईक मनोज पाटील हे गस्तीवर असताना त्यांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या राहुल संजय शिरसाठ (वय २४, रा. जोर्वे, ता. संगमनेर), किरण संजय काळे (१८, रा. अकलापूर, ता. संगमनेर, हल्ली रा. धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर) व एक विधीसंर्घषीत बालक अशा तिघांना पकडले होते. त्या सर्वांना पोलीस ठाण्यात आणत शिरसाठ व काळे यांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली. तसेच विधीसंर्घषीत बालकाला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस तपासात अनेक दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांनी चोरलेल्या दहा दुचाकी, मोबाईल व वाद्य मशीन, तसेच इतरही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. संगमनेर शहर, तालुका, घारगाव, आश्वी व अकोले तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.
दुचाकी चोरांना पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST