राहुरी शहर हद्दीतील जंगम गल्ली परिसरात असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसरात एका बंद असलेल्या घराचे कुलूप काल दोन चोरट्यांनी तोडून घरातील भांडे व इतर काही सामान पोत्यात भरून चोरून नेले होते. सदर चोरीची घटना घरमालकाच्या लक्षात आल्यानंतर ते आज घरावर लक्ष ठेवून होते. १ जून रोजी दुपारी ११.३० वाजेदरम्यान तेच चोरटे मद्यधुंद अवस्थेत येऊन चोरी करण्याच्या उद्देशाने पुन्हा त्याच घरात घुसत असताना परिसरातील काही तरुणांनी त्यांना हटकले. यावेळी काही नागरिकांनी राहुरी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, चोरटे पूर्ण मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांचे काय करायचे, असा प्रश्न पोलिसांना पडला होता.
सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे रोजगार मिळत नाही. त्यामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. विहिरीतील मोटारी, केबल, तसेच बंद घरातील सामान चोरी जात आहे. या घटनांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पोलीस प्रशासनाने या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
020621\img-20210601-wa0246.jpg
चोरी करत असताना दोघांना नागरिकांनी रंगेहात पकडले