शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन टीएमसी अतिरिक्त पाणी

By admin | Updated: July 27, 2016 00:41 IST

अहमदनगर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध यंत्रणांनी पूर्ण केलेल्या कामांमुळे जिल्ह्यात ५६ हजार टीसीएम म्हणजे दोन टीएमसीपाणीसाठा नव्याने उपलब्ध झाला आहे़

अहमदनगर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध यंत्रणांनी पूर्ण केलेल्या कामांमुळे जिल्ह्यात ५६ हजार टीसीएम म्हणजे दोन टीएमसीपाणीसाठा नव्याने उपलब्ध झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील २७९ गावांतील १ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़गेल्या वर्षभरात २७९ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले़ अभियानासाठी निवडलेल्या गावांत शिवार फेरी घेऊन आराखडा तयार करण्यात आला़ तो ग्रामसभेत सादर करून अंतिम करण्यात आला़ गावकऱ्यांच्या सहकार्याने निवड झालेल्या गावांत जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली़ या कामांमुळे प्रशासनावर सुरुवातीला टिकाही झाली़ परंतु पाऊस पडल्यानंतर या कामांचा परिणाम दिसू लागला आहे़ बहुतांश गावांतील शिवार जलयुक्त झाले असून, पाणीपातळीत वाढ झाली आहे़ जिल्हाप्रशासनाच्या माहितीनुसार जलयुक्त अभियानांतर्गत निवडलेल्या २७९ गावांत १४ हजार ४९१ कामे हाती घेण्यात आली होती़ त्यापैकी १३ हजार ९४७ कामे पूर्ण झाली आहेत.पावसाने दमदार हजेरी लावल्याने माती नाला बांध, नाला खोलीकरण, शेततळे, जलस्त्रोतांची दुरुस्ती आणि शेततळ्यांत एकूण ५६ हजार ५६८ टीसीएम पाणी साठले गेले आहे़ म्हणजेच दोन टीएमसी पाणीसाठा यामुळे उपलब्ध झाला आहे़ जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मातीनाला बांधातील गाळ काढणे, मातीनाला बांध, नाला खोलीकरण, जलस्त्रोतांची दुरुस्ती, सलग समपातळी चर, खोल सलग समपातळी चर, कंपार्टमेंट बंडिंग आदी कामांमुळे पाणीपातळीत वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे़ ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे त्याचा वापर परिसरातील शेतीसाठी करणेही शक्य होणार आहे़ पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहिल्यास पाणीसाठ्यात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)