शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेवरून दोन शिक्षकांना मारहाण, तीन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:29 IST

नेवासाफाटा येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेतील शिक्षकाने बारावीच्या परीक्षा चालू असताना आवारात थांबू नको

नेवासा : नेवासाफाटा येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेतील शिक्षकाने बारावीच्या परीक्षा चालू असताना आवारात थांबू नको, असे एकास सांगितल्याचा राग मनात धरून दोन शिक्षकांना मोटारसायकलवर अडवून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. नेवासा पोलिसांनी आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अशोक नंदू पानकडे (वय २७ रा. मुकिंदपूर ता. नेवासा) या शिक्षकाने फिर्याद दिली आहे. मुकिंदपूर शिवारातील आसाराम महानोर यांच्या वस्तीजवळ शाळेचा विद्यार्थी आजारी असल्याने त्यास काल (दि.१३) रोजी मोटारसायकलवरून आणखी शिक्षक संदीप वाघमारे यांच्यासह दवाखान्यात घेऊन जात होते. त्यावेळी ६ मार्चच्या शाळेत बारावीचा पेपर चालू असताना अमोल बानकर याला शाळेच्या आवारात फिरु नको असे म्हटले होते. त्याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या अमोल राजेंद्र बानकर, प्रवीण भाऊसाहेब कोळेकर, सादीक पठाण, (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व (रा. खडका ता. नेवासा) तसेच दिगंबर फुलसौंदर (रा. देवगडफाटा ता. नेवासा), गणेश पारखे व त्याचा भाऊ (नाव माहित नाही) रा. प्रवरासंगम तसेच इतर अन्य ८ साथीदार  या सर्वांनी मोटारसायकल अडवून अमोल राजेंद्र बानकर, सादिक पठाण अशा दोघांनी मला व शिक्षक संदीप वाघमारे यांना लाकडी दांडक्याने मारहाण, शिवीगाळ केली. प्रवीण कोळेकर याने त्याच्या हातातील तलवार उगारली व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अमोल बानकर, गणेश पारखे, सादिकपठाण या तिघांना अटक केली असून पोलीस नाईक संतोष फलके करत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर