शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीत तरुणाचा खून करणाऱ्या दोघा संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 20:49 IST

शिर्डी: येथील बस स्थानकासमोर व साईबाबा रूग्णालयाच्या लगत असलेल्या नगरपंचायतच्या सार्वजनिक शौचालयात विवस्त्र असलेल्या एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे़ यातील दोघा संशयितांना पोलिसांनी सायंकाळी अटक केली आहे. राजू माळी व सुनील तांबोरे असे आरोपीचे नाव असून उशिरापर्यंत त्यांनी मयताचे नाव सांगितले नव्हते.

शिर्डी: येथील बस स्थानकासमोर व साईबाबा रूग्णालयाच्या लगत असलेल्या नगरपंचायतच्या सार्वजनिक शौचालयात विवस्त्र असलेल्या एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे़ यातील दोघा संशयितांना पोलिसांनी सायंकाळी अटक केली आहे. राजू माळी व सुनील तांबोरे असे आरोपीचे नाव असून उशिरापर्यंत त्यांनी मयताचे नाव सांगितले नव्हते.शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यातील मयत तरुणाचे वय पस्तीस होते़ शनिवारी सकाळी विवस्त्र अवस्थेत असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा चेहरा ओळखू येवू नये म्हणून दगडाने ठेचण्यात आला होता़ या घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दिपक गंधाले, मिथून घुगे, वाहतूक शाखेचे निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली़मयत व्यक्ती बांधकाम मजूर असण्याच्या शक्यतेने या परिसरात नेहमी वावर असलेल्या बांधकाम कामगारांकडे सखोल चौकशी सुरू करण्यात आली़ याशिवाय परिसरातील सीसीटिव्ही फुटेजही तपासण्यात आले़ सायंकाळ पर्यंत मयत व्यक्तीची ओळख पटली नव्हती़