शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दोन विद्यार्थ्यांना कैद

By admin | Updated: August 9, 2014 00:19 IST

अहमदनगर : दोघा विद्यार्थ्यांना न्यायदंडाधिकारी एम. एस. तोडकर यांनी प्रत्येकी एक वर्षाची साधी कैदेची शिक्षा ठोठावली

अहमदनगर : एका विद्यार्थ्याच्या जागेवर दुसऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्याने दोघाही विद्यार्थ्यांना दोषी ठरवून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. तोडकर यांनी प्रत्येकी एक वर्षाची साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. परीक्षेतील ठकबाजीबद्दल झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचा दावा विधीज्ञांनी केला आहे.नगर महाविद्यालयातील केंद्रावर बोर्डाच्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला ठकबाजीचा प्रकार घडला होता. १२ मार्च २००९ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गणिताच्या पेपरला हा प्रकार घडला होता. नगर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याच्या नावावर दुसऱ्याने परीक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. प्रवेशकुमार चंद्रशेखर मेहता (वय १९, रा. जनरल अरुणकुमार वैद्य कॉलनी, भिंगार) आणि निखिल देविदास धुलियॉ (वय १९, रा. आलमगीर, भिंगार) अशी त्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. धुलिया या विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर मेहता याने स्वत:चा रंगीत फोटो लावला आणि गणिताचा पेपर दिला. ही बाब नगर कॉलेज प्रशासनाच्या लक्षात आली. नगर कॉलेजचे प्रा. श्याम शरद खरात यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांविरुद्ध ठकबाजी केल्याचा गुन्हा दाखल केला. दोन्हीही आरोपींना पोलिसांनी अटक केली आणि ते जामिनावर सुटले होते. दरम्यान पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तोडकर यांच्यासमोर खटला सुरू झाला. त्याची दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. या प्रकरणात सरकारी पक्षाने १३ साक्षीदार तपासले.ठकबाजीच्या दोन्ही वेगवेगळ््या कलमांन्वये सहा महिने आणि एक वर्षाची साधी कैद आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा आणि पाचशे रुपये दंड असे शिक्षेचे स्वरुप आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सचिन सूर्यवंशी आणि अ‍ॅड. संगीता ढगे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांना मिळालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचा दावा अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)