शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली प्रवराच्या मुख्याधिका-याने घेतली २ लाखाची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 19:00 IST

देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानाभाऊ महानवर व सहाय्यक फायरमन मुकूंद मुसमाडे यांना बुधवारी (दि़६) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली़

अहमदनगर/राहुरी: देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानाभाऊ महानवर व सहाय्यक फायरमन मुकूंद मुसमाडे यांना बुधवारी (दि़६) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली़विविध शहरात साफसफाईचे कामे करणाºया कंपनीला राहाता शहरातील साफसफाईचे काम मिळाले होते़ या कंपनीच्या माध्यमातून १ डिसेंबर २०१८ पासून कामास सुरूवात झाली होती़ ५ जानेवारी २०१९ रोजी राहाता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी या कंपनीचे काम बंद करण्याचे आदेश दिले़ याबाबत देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब विश्वनाथ महानवार यांनी सदर कंपनीच्या संचालकास बोलावून घेतले़ माझ्याकडे जिल्हा नियोजन अधिकारीचा अतिरीक्त कार्यभार होता तेव्हा मिच प्रयत्न करून तुमची राहता येथील साफसफाई कामाबाबतची ई-निविदा मंजूर करून घेतली आहे. त्या बदल्यात बक्षिस म्हणून व मुख्याधिकारी राहता यांचेशी मध्यस्ती करून कामास असलेला स्थगिती आदेश मागे घेण्यास सांगतो. असे म्हणून या मोबदल्यात एकूण निविदा रकमेवर ६ टक्के प्रमाणे तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली. याबाबत सदर कंपनीच्या संचालकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीच्या अनुषंगाने ३० जानेवारी रोजी लाच मागणीची पडताळणी केली असता, यातील मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी तक्रारदार यांच्याकडे ६ टक्के प्रमाणे दोन लाख रुपए लाचेची मागणी केल्याचे समोर आले़ ही लाचेची रक्कम महानवर यांनी बुधवारी देवळाली प्रवरा नगर परिषदेतील सहाय्यक फायरमन मुकूंद रामराव मुसमाडे याला स्विकारण्यास सांगितली. त्यांच्या सांगण्या प्रमाणे यातील मुकूंद मुसमाडे यांनी सदर लाचेची दोन लाख रुपये रक्कम ही राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड रोडवरील समाधान हॉटेलचे लगत असलेल्या सेट्रल बॅकेच्या समोर रस्त्यावर घेतली. याचवेळी सापळा लावून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली़ यावेळी महानवर यांना देखील ताब्यात घेण्यात आले़ही कारवाई पोलीस उपधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, हवालदार तनवीर शेख, पोलिस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल, राधा खेमनर, शोर रक्ताटे यांच्या पथकाने केली़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर